आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Udayan Raj's Criticism Of Uddhav Thackeray Established An Army In The Name Of Shivaji Maharaj, So It Became Mine?; If So, Should You File A Claim Against Maharashtra?

उदयनराजेंचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र:शिवरायांच्या नावे शिवसेना स्थापन केली, म्हणजे ती माझी का?; मग महाराष्ट्रावर दावा सांगावा का?

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेना स्थापन केली म्हणजे ती माझी झाली का? असा उपहासात्मक सवाल खासदार उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे, असे असेल तर महाराष्ट्रावर दावा करायला हवा असेही उदयनराजेंनी म्हटले आहे. छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोकांचा आहे. आम्ही त्यांच्यामधून निवडून येतो म्हणून हे सर्व जनतेचे आहे.

शिवसेनेवर जोरदार टीका

सर्व पक्षात बंड होत असते, अनेक जण एकत्र येत असतात जेव्हा मनात स्वार्थ बांधून एकत्र येतात तेव्हा त्यांना एकत्र ठेवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात आणि स्वार्थ संपला की हे लोक आपल्या मार्गाने जातात असे मत उदयनराजेंनी स्पष्ट करताना शिवसेनेवर टीका केली आहे. ज्यावेळी लोक विचारांनी एकत्र येतात त्यावेळी त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कोणत्या ताकदीची गरज आहे, असे मला वाटत नाही, त्याचे उदिष्ट एक असते मी पोटात एक आणि ओठावर एक असे बोलत नाही असेही म्हणताना शिंदे गट कायमस्वरुपी एकत्र राहणार आहे. त्यांना लोकांनी स्वीकारले आहे. सत्ता का गेली यासाठी आत्मक्लेश करायची वेळ आली नसते असे उदयनराजे टीकास्त्र उद्धव ठाकरेंवर डागले आहे.

फडणवीसांनी मराठा आरक्षण दिले

प्रत्येक जण उठतो आणि म्हणतो मराठा आरक्षण मात्र, मराठा असून तुम्ही काय केले आरक्षणासाठी अशोकांच्या झाडासारखे वाढले, इतरांना सावली दिली नाही असा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी खूप प्रयत्न केले. आता काही जण ते मराठा नाही असे म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडत आहे. मात्र, नुसते पाटील, जाधव, महाडिक अन् भोसले नाव लावून काही होत नाही. समाजाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहेत. मी जात पात माणत नाही मात्र काही जण खूप जातीयवादी झाले आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

साताऱ्यांने देशाला दिशा दिली

अगदी सुरूवातीपासून देशाला साताऱ्याने दिशा दिली आहे. आज मुख्यमंत्री देखील साताऱ्याचे आहे, शिक्षणांची चळवळ देखील साताऱ्यातून सुरू झाली होती. असे म्हणताना शंभुराजे जिल्ह्यातील आहेत मात्र पालकमंत्री कुणाला करायचे ते मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री ठरवतील असे उदयराजेंनी म्हटले आहे. भाजपने जिल्ह्यातून मंत्रीपद दिले नाही, तो ठरवण्याचा मला अधिकार नाही, मी नेता कसाच वाटत नाही असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...