आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापुरुषांच्या अवमानाबद्दल खा. उदयनराजे भोसले यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. मात्र, राज्य व केंद्र सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराडमध्ये माध्यमांशी बोलताना दिली.पवार म्हणाले की, महापुरुषांच्या वक्तव्याबद्दल लोकांमध्ये राग आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जबाबदार व्यक्तींनी केलेली विधाने सामान्यांना अस्वस्थ करणारी आहेत.
त्याची प्रतिक्रिया भविष्यात दिसेल. ‘कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःची संस्था चालवताना मुलांना दोन वेळचे अन्न नसल्याने स्वतःच्या पत्नीचे दागिने विकून मुलांना शिकवले. ते भिक मागत नव्हते. महापुरुषांचे एवढे मोठे योगदान असूनही त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केली जात आहेत. बोलताना राज्यकर्त्यांना तारतम्य राहिलेले नाही, अशी टीका शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांचा नामोल्लेख टाळून केली.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.