आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार उदयनराजेंची खंत:शिवरायांचा सन्मान व्हावा, हे सांगण्याची वेळ येणे ही शोकांतिका; पुणे बंदला उत्सफूर्त प्रतिसाद

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी खस्ता खाल्ल्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वराज्यासाठी वेचले, असे असताना शिवरायांचा सन्मान व्हावा, हे सांगण्याची आज वेळ येते ही शोकांतिका आहे, अशी खंत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

यावेळी उदयनराजेंनी मागणी केली की, मी याधीही माझी भूमिका मांडली आहे. ज्या प्रमाणे नूपुर शर्मा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली, त्याच पद्धतीने शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

बंदला उत्सफूर्त प्रतिसाद

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पुण्यातील विविध संघटनांनी आणि पक्षांनी मिळून आज पुणे बंदची हाक दिली. पुण्यातील व्यापारी, रिक्षा चालक, हमाल पंचायत, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आदींनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मोर्चात सर्वपक्षीय नेते

पुण्यातील डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती उदयनराजे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर निषेध रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन दादा जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे , प्रदीप देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, विकास पासलकर, मुस्लिम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार सहभागी झाले. हा मोर्चा लाल महाल येथे आल्यावर खासदार उदयन राजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उदयनराजे भोसले म्हणाले, आज मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले. यावरून ३५० वर्षानंतरही महाराजांबद्दल प्रेम आणि आदर किंचितही कमी झालेले दिसत नाही. ज्या वेळी मी रायगडला गेलो तेव्हा मला वेदना झाल्या. काही फुटकळ आणि विकृत लोक कारण नसतांना विधाने करतात, असे म्हणत त्यांनी राज्यपाल आणि आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर निशाण साधला. नूपुर शर्मा यांच्यावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई केली, त्याच पद्धतीने महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांविरोधात व्हायला हवी. आज जे पुण्यात आंदोलन झाले, तशीच भावना ही संपूर्ण राज्याची आहे, असेदेखील उदयन राजे भोसले म्हणाले.

मोदी भेटीबाबत बोलणे टाळले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उदयनराजेंची भेट झाली. मात्र, त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही, हा प्रश्न विचारला असता उदयनराजे भोसले यांनी बोलण्याचे टाळले.

बातम्या आणखी आहेत...