आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजेंचा केंद्र सरकारला सवाल:नुपूर शर्माला जो न्याय, तोच कोश्यारींना का नाही?; उदयनराजेंना अटक करा, अ‌ॅड. सदावर्तेंची मागणी

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुपूर शर्मांचे जसे निलंबन केले तसेच राज्यपाल कोश्यारींना का हटवले नाही, असा संतप्त सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकारला चिचारला आहे. तर नुपूर शर्मांला एक राज्यापालांना तोच न्याय का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यात राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आज बंद ठेवण्यात आला होता. यावेळी काढलेल्या मोर्च्यातून खासदार उदयनराजे भोसले यांनी हा संतप्त सवाल केला आहे.

शिवरायाबद्दल लोकांच्या मनात साडेतीनशे वर्षांनंतरही प्रेम कायम आहे. त्यांच्या सन्मान व्हावा हे सांगण्याची वेळ आपल्यावर आली हीच खरी शोकांतिका आहे, अशी खंत खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे. पक्ष ही दुय्यम गोष्ट आहे, राज्यपाल यांच्याबद्दल तातडीने भूमिका घ्यायला हवी अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे. नुपूर शर्मांचे जसे निलंबन केले तसेच राज्यपालांना का हटवले नाही, राज्यापालांना तोच न्याय का नाही असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

उदयनराजेंना अटक करा- सदावर्ते

पुण्यातील बंद बेकादेशीर असल्याने खासदार उदयनराजे भोसले यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टाने अनेकदा सांगितले आहे की, बंद करणे हा कायद्यानुसार बेकादेशीर आहे. बंदच्या नावाखाली मोर्चा काढणे आणि लोकांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे सांगतानाच या बंदची हाक देणाऱ्याना अटक केली पाहिजे अशी भूमिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली आहे. अशा प्रकारणे बंद करणे किंवा मोर्चा काढणे लोकांना वेठीस धरणे हे विद्यमान विरोधी पक्षात असलेले अजित पवार, संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले यांनी बंदचा नारा दिला आहे. भाजीवाला असेल, रिक्षावाला असेल त्यांचे हातावर पोट भरते आणि त्यांना जबरदस्तीने बंदमध्ये सहभागी करुन घेत त्यांच्या पोटावर पाय देऊ शकत नाही. यामुळे उदयनराजे यांना तातडीने बेड्या ठोकल्या पाहिजे अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...