आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष व दाेन वेळा नगरसेवक पद भूषवलेले काेथरुड परिसरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शाम देशपांडे यांनी मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. देशपांडे यांचे पत्नी संगीता देशपांडेही दाेन वेळा नगरसेवक राहिलेल्या आहे.
यावेळी मंत्री गिरीश महाजन,भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पुण्याचे माजी महापाैर मुरलीधर माेहाेळ उपस्थित हाेते. शाम देशपांडे हे मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हाेते. सन १९९९ मध्ये त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला हाेता. त्यानंतर २००२ आणि २००७ असे दाेन वेळा ते नगरसेवक हाेता.
त्यानंतर शिवसेनेच्या वतीने सन २००८-०९ पुणे महानगरपालिकेची स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले हाेते. त्यानंतर सन २०१२ ते २०१४ दरम्यान ते शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष हाेते. त्याचवेळी त्यांच्या पत्नी सन २०१२ आणि सन २०१७ मध्ये दाेन वेळा मनपाच्या नगरसेविका हाेत्या.
मागील वर्षी मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आक्रमक टिका केली हाेती. त्यावेळी शाम देशपांडे यांनी जाहीर नाराजी दुसऱ्या दिवशी व्यक्त करत पक्षप्रमुख यांना शिवसेनेचे काम अशाप्रकारे हाेऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर देशपांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली हाेती. त्यानंतर देशपांडे काेणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता हाेती. अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला असून आगामी मनपाच्या दृष्टीने काेथरुड परिसरातून पुन्हा निवडणुक लढण्याचे संकेत मिळू लागले आहे.
देशपांडे यांच्या सोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही भाजप पक्ष प्रवेश केला आहे. यामध्ये विनोद गायकवाड, नारायण पाटील, समीर भट, अनिल हिंगमिरे, लक्ष्मण क्षिरसागर, नामा देडे, महेंद्र आढाव, गोविंद चव्हाण, विजय कोलसे, तुषार गाढवे,अनिल मरळ ,सुरेश कुलकर्णी यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.