आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउदगीर येथे होणारे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘तांत्रिक’ मुद््द्यावर अडकण्याचा पेच संपुष्टात आला असून, मराठवाडा साहित्य परिषदेच्या अखत्यारीतच ते पार पडेल, हे स्पष्ट झाले आहे. औरगाबादकरांची आग्रही भूमिका आणि मुंबई मराठी साहित्य संघाने आपला आग्रह मागे घेण्यात दाखवलेला सौम्यपणा, यामुळे हे संमेलन ‘मराठवाडा साहित्य परिषदेचे की तांत्रिक मुद्यावर मुंबई मराठी साहित्य संघाचे, हा पेच निकाली निघाला आहे. साहित्य संमेलनाचे आयोजन साहित्य महामंडळामार्फत निमंत्रक संस्थेकडून केले जाते. नियमानुसार, साहित्य महामंडळाचे कार्यालय दर तीन वर्षांनी महामंडळाच्या चार घटक संस्थांकडे फिरत्या स्वरूपात सोपवले जाते. गेल्या तीन वर्षांपासून साहित्य महामंडळ औरंगाबादच्या मराठवाडा साहित्य परिषदेकडे आहे. साहित्य महामंडळाच्या प्रत्येक घटक संस्थेला आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात तीन साहित्य संमेलने आयोजित करण्याचा मान मिळतो. दर तीन वर्षांनी एक एप्रिल रोजी (आर्थिक वर्षानुसार) महामंडळाचे कार्यालय पुढील घटक संस्थेकडे हस्तांतरित केले जाते. त्यानुसार यंदा, एक एप्रिल २०२२ रोजी साहित्य महामंडळ मुंबई मराठी साहित्य संघाकडे जाणे अपेक्षित होते. त्यामुळे मुंबई मराठी साहित्य संघाकडून मराठवाडा साहित्य परिषदेकडे अधिकृत पत्रव्यवहार झाला. मात्र, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष काैतिकराव ठाले पाटील यांनी उदगीर संमेलनाची सर्व तयारी आम्ही केली, तसेच कोरोना संकटामुळे संमेलन आयोजनात आलेल्या अडचणींचा विचार करून, तिसरे संमेलन आयोजित करण्याचा मान मराठवाडा साहित्य परिषदेलाच मिळावा आणि त्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळावी, अशी भूमिका घेतली. मुंबईकडून कार्याध्यक्ष उषा तांबे यांनी याविषयी नापसंतीचे पत्र मराठवाडा परिषदेला पाठवले. त्यामुळे तांत्रिक मुद््द्यावरून औरंगाबाद आणि मुंबई, आमनेसामने आल्याची साहित्य वर्तुळात चर्चा झाली. अखेरीस, ठाले पाटील यांच्या आग्रही भूमिकेला मुंबईवाल्यांनी मान दिला आणि संमेलन औरंगाबादच्या मराठवाडा साहित्य परिषदेकडेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे आता २२ ते २४ एप्रिलला उदगीर येथे संमेलन आयोजित केले जाईल. त्यानंतर १ मे रोजी साहित्य महामंडळ मुंबई मराठी साहित्य संघाकडे तीन वर्षांसाठी सोपवले जाईल.
एक मेपासून मुंबईकडे असेल कारभार
साहित्य महामंडळाचे कार्यालय आता एक मे रोजी मुंबई मराठी साहित्य संघाकडे सोपवले जाईल. उदगीर संमेलनाची सर्व तयारी, नियोजन मराठवाडा साहित्य परिषदेने मार्गी लावले असल्याने प्रत्यक्ष संमेलनही आम्हाला मिळावे, असा मसापचा आग्रह होता. मुंबईने हा आग्रह मान्य केला आहे. याआधीची अशा प्रकारचे निर्णय घेतले गेले आहेत, असे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.