आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आतापर्यंत भारतात 20 लोकांना ब्रिटनमधील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यादरम्यान पुण्यातून भीतीदायक माहिती समोर येत आहे. ब्रिटनहून पुण्यात आलेले 109 लोक बेपत्ता आहेत. या सर्वांचा शोध घेतला जात आहे. ही बाब चिंतादायक असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ब्रिटनहून मुंबई आणि त्यानंतर पुण्यात येणार्या 542 प्रवाशांपैकी 109 प्रवाशांचे पत्ते व संपर्क तपशील उपलब्ध नाहीत. हे लोक गेल्या 15 दिवसात पुण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेची अनेक पथके सातत्याने त्यांचा शोध घेत आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडूनही मदत घेण्यात आली आहे. त्यांची माहिती नसल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यांनी लोकांना पुढे येऊन तपास करून घेण्याचे आवाहन केले आहे. महापौरांनी लोकांना त्यांच्या शेजारी येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
पुणे महानगरपालिकेने जारी केले हेल्पलाईन नंबर
पुणे महानगरपालिकेच्या प्रोटोकॉल नुसार, मध्य पूर्व आणि युरोपियन देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना शहराजवळील हॉटेलमध्ये सात दिवस क्वारंटाइन राहणे अनिवार्य आहे. निर्देशानुसार प्रवाशात कोरोना विषाणू आढळल्यास त्याला थेट पुणे येथील नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाईल.
मागील 15 दिवसांत यूकेतून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या प्रवाशांना 020-25506800 / 01/02/03 या पीएमसीच्या हेल्प डेस्ककडे रिपोर्ट करणे अनिवार्य केले आहे.
ब्रिटनहून परतलेल्या 20 लोकांना नवीन स्ट्रेनची लागण
देशात ब्रिटनमधील जास्त धोकादायक कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 20 वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. मंगळवारीच, यापैकी 6 लोक नवीन कोरोना संसर्गामुळे पॉझिटिव्ह झाल्याचे आढळले. दरम्यान पुणे, हैदराबाद आणि भुवनेश्वरमध्ये UK हून परतलेले अनेक लोक बेपत्ता आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.