आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनधिकृत बांधकामांची तक्रार न करण्यासाठी आणि पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाखांच्या खंडणीची मागणी करत तडजोडीअंती चार लाख रूपयांची मागणी करणार्या एका भामट्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
सोनु आण्णा सोनवणे (रा. लक्ष्मी कॉलनी, जुना कॅनॉल जवळ, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत रमेश नंदकुमार दंडाले (40, रा. शेवाळेवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रमेश दंडाले यांचा प्लॉटींगचा व्यावसाय आहे. फिर्यादी यांनी एक प्लॉट नवनाथ कादमाने यांना विक्री केला होता. त्यात त्यांनी अनधिकृतपणे पाच मजली इमारतीचे बांधकाम चालु केले होते. त्या अनुषंगाने दंडाले हे पीएमआरडीए कार्यालयात तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर तेथे त्यांना आरोपी सोनु सोनवणे याने यापूर्वीच तक्रार दिल्याचे समजले.तसेच संशयीत आरोपी सोनू सोनवणे याने तक्रारदार यांच्या विरूध्द तहसिलदार यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता.
दडाले यांच्या विरुद्ध त्याने आकुर्डी पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा असा खोटा तक्रार अर्ज देखील केला होता. त्यावेळी फिर्यादी हे आकर्डी पोलिस ठाण्याच्या बाहेर येत असताना सोनवणे याने दंडाले यांना अडवत प्रकरण मिटवायचे असेल तर 50 लाख रूपये खंडणी मागितली होते. तडजोडीअंती त्याने चार लाखांची खंडणी मागितल्याचे दंडाले यांनी त्यांच्या तक्रारीत सांगितले आहे. हा प्रकार 10 जानेवारी 2023 रोजी घडला. सोनवणे याच्यावर आता खंडणी आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.