आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Union Finance Minister Nirmala Sitharaman Baramati Visit | Sharad Pawar And Nirmala Sitharaman | Baramati Visit Sitharaman | Supriya Sule ReAction Nirmala Sitharaman Baramati Visit

अमेठीनंतर भाजपचे मिशन 'बारामती':पवारांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सीतारामन यांची विशेष रणनीती

बारामती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बारामती दौऱ्यावर आहेत. 2024 लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपची विशेष रणनीती सुरू आहे. पवारांच्या बारामतीला खिंडार पाडण्यासाठी आता मिशन बारामती भारतीय जनता पार्टीने हाती घेतल्याची चर्चा महाराष्ट्रमध्ये सुरू झाली आहे. दरम्यान काल पत्रकार परिषदेत शरद पवारांनी बारामतीत मोदीही येऊन गेले, असे म्हणत बारामतीला खिंडार पडणार नाही, असे थेट आव्हान भाजपला दिले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदार संघावर संपूर्ण शक्ती पणाला लावण्याची जोरदार तयारी भाजपने केल्याचे दिसून येते. या मिशन बारामतीची आजपासून सुरुवात होत असल्याचे बोलले जात आहे. कारण देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बारामतीचा दौरा करणार आहेत.

तीन दिवस दौरा

गेल्या काही दिवसांपासून अर्थमंत्र्यांच्या बारामती दौऱ्याची चर्चा सुरू होती. आज अखेर त्या बारामतीत दाखल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्मला सीतारामन यांचा 3 दिवस दौरा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक तसेच संघटनात्मक आढावा यावेळी घेतला जाईल. अर्थमंत्री या भूमिकेतून त्या कोणत्या मोठ्या घोषणा करणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

मी स्वतः स्वागत करेल

दरम्यान, बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्र्यांचे स्वागत केले आहे. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या जर अर्थमंत्र्यांना वेळ असेल तर मी स्वतः त्यांना बारामतीचे विकास काम पाहण्यासाठी सोबत घेऊन जाईन.

चंद्रशेखर बावनकुळेंची तयारी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील काही दिवसांपूर्वीच बारामती दौरा केला होता. आम्ही बारामती लढणारच. निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाची. शरद पवारांनी इथे मोट बांधली असली किंवा कितीही प्रयत्न केले तरी देशाचे विश्वगुरू नरेंद्र मोदीच आहेत. भारताला मजबूत करण्याचे मोदींचे व्हिजन आहे, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले होते.

अमेठीनंतर आता बारामती

मिशन बारामती मोहिमेला प्रत्यक्ष आजपासून प्रारंभ होणार आहे. अमेठी मतदारसंघ जिंकला, आता बारामतीही जिंकणार, असा विश्वास या दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा प्रस्तावित आहे. या दौऱ्यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शाब्दिक लढाई सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...