आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय अर्थमंत्र्यांचा बारामती दौरा:निर्मला सीतारामन यांनी जेजुरीत घेतले खंडेरायाचे दर्शन; पाहा PHOTOS

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौऱ्यावर आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये निर्मला सीतारामन भेट देऊन विविध घटकांशी संवाद साधत आहे.

यावेळी त्यांच्यासोबत इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हेदेखील उपस्थित होते. माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, आमदार माधुरी मिसाळ, आमदार उमा खापरे, कांचन कुल, अंकिता पाटील यांच्यासह जेजुरी गडाचे विश्वस्त उपस्थित हाेते.

केंद्रीय अर्थमंत्री बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी खंडेरायाच्या मंदिराला भेट दिली. देवस्थानच्या वतीने निर्मला सितारामन यांच्या दौऱ्याची तयारी करण्यात आली होती. निर्मला सीतारामन यांनी जेजुरी संस्थानच्या पदाधिकऱ्यांची बैठकही घेतली. त्यावेळी देवस्थानच्या वतीने निर्मला सीतारामन यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात जेजुरी गडाला पर्यटनाचा दर्जा मिळावा, वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळावा तसेच जेजुरी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबवाव्यात, अशी मागणी जेजुरी संस्थानच्या वतीने अर्थमंत्र्यांना करण्यात आल्याचे पंकज निकुडे यांनी सांगितले.

जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेऊन त्या जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांची संवाद साधला आहे. सकाळी दहा वाजता जेजुरी येथेच पुरंदर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून, दुपारी बारा वाजता मोरगाव येथे शासकीय अधिकाऱ्यांसमवेत त्या आढावा बैठक घेणार आहेत.

अर्थमंत्र्यांनी दर्शनानंतर पुजारी वर्गाशीही संवाद साधला आहे
अर्थमंत्र्यांनी दर्शनानंतर पुजारी वर्गाशीही संवाद साधला आहे

निर्मला सीतारामण यांनी खंडेरायचे दर्शन घेण्यासाठी पाेलीसांनी चाेख बंदाेबस्त जेजुरी गडावर ठेवला हाेता. ठिकठिकाणी पाेलीसांनी तपासणी पथके तैनात केली हाेती. गुरुवारी खडकवासला अणि भाेर तालुक्यातील दाैरा केल्यानंतर त्या शुक्रवारी बारामती, पुरंदर तालुक्याचा दाैरा करत आहे. सितारामन यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या गडावरील मंदिराची पाहणी करत मंदिराचा इतिहास विश्वस्तांकडून जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी खंडेरायचे दर्शन घेत भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी गडावरील ऐतिहासिक खंडा तलवारची पाहणी केली. सदर प्रसंगी या मोठ्या आणि जड तलवारीची प्रातेशिक त्यांना करून दाखविण्यात आली. मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचा खंडोबाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

निर्मला सीतारमण म्हणाल्या?

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत केंद्रातून काही तरी तडजोड होते, या विचारातून कार्यकर्ते काम करत नाहीत. मात्र या वेळी केंद्रातून कोणतीही तडजोड होणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाजप कार्यकर्त्यांना केल्या.

भाजपकडून लोकसभा प्रवास योजना राबवली जात आहे. त्यानुसार सीतारमण या तीनदिवसीय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात सीतारमण यांनी गुरुवारी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून केली. धायरी‌ येथील मुक्ताई गार्डन येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...