आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात काँग्रेस शासित राज्यात पुलवामा दहशतवादी हल्ल्यामधील शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांवर अन्याय करण्यात येत आहे.काँगेस नेते राहुल गांधी हे विदेशी भूमीवर जाऊन आपल्या देशातील सैनिकांचं मनोबल कमी करत आहेत. आसाम आणि अरूणचल प्रदेश मधील भारतीय सैनिकांना राहुल गांधी हे 'ऑक्यूपाइड आर्मी ' असे संबोधतात. त्यामुळें काँग्रेस पक्ष आसाम आणि अरुणाचल प्रदेशला भारताच भूभाग मानते की नाही ? हे काँग्रेसने आधी स्पष्ट कराव अशी मागणी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
ठाकूर म्हणाले, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा घेतलेली नसून भारत तोडो यात्रा हाती घेतल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येत आहे. गुजरात मध्ये काँग्रेस पक्ष नेस्तनाबूत झाल्याचे दिसून येत आहे तर नुकताच पार पडलेल्या त्रिपुरा , नागालँड, मेघालय मधील निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे. मते आणि विदेशी मतांसाठी काँग्रेस पक्ष खालच्या स्तराला जाऊन वागत असल्याची खरमरीत टीका त्यांनी करत ते म्हणाले, पुलवामा घटना केवळ एक कार अपघात असल्याचे सांगत काँग्रेस सैनिकांचा अपमान करत आहे. सर्जिकल स्ट्रईक वेळीही काँगेस पक्षाने सैनिक कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत पुरावे मागितले. चीनच्या आक्रमणाबाबत काँग्रेस पक्ष गप्प असते. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी देशाचे सुरक्षा दलाचे मजबुतीकरण केले नाही. त्याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात बुलेटफ्रुप जॅकेट ते अत्याधुनिक शस्त्र सैनिकांना देऊन सैनिकांचे मनोबल वाढवले आहे. जगामध्ये भारत आता डोळे खाली करून नाही तर दुसऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून संवाद करू शकतो हा आत्मविश्वास देशाने मिळवला आहे.
दिल्ली सरकामधील "वी" हा कोण आहे ?
दिल्ली सरकारमधील अबकारी विभाग घोटाळ्यात, वी निड्स मनी...असे म्हणणारे दिल्ली सरकामधील "वी" हा नेमका कोण आहे ? हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अगोदर स्पष्ट करावे अशी मागणी करत मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, दारू घोटाळ्यात 'वी ' ची प्रमुख भूमिका असून त्यामागे मुख्यमंत्री केजरीवाल आहे. गैरव्यवहार पैसे कोणासाठी गोळा केले जात होते. दिल्ली सरकार मध्ये 'वी ' ची भूमिका कशामुळे वाढली हे केजरीवाल यांनी स्पष्ट करावे.
लालूंचा प्लॉट दो नोकरी लो घोटाळा
अनुराग ठाकूर म्हणाले की, लालू सरकारने चारा घोटाळ्यानंतर नोकरी बदल्यात प्लॉट घोटाळा केलेला असून त्याबाबतची माहिती उघडकीस येऊ लागली आहे.तेलगणा मध्ये सरकारने तेलाचे खजिने कमी केले आहे. एका परिवारात सर्व काम केले जात होते. तेलंगणा मध्ये जमीन घोटाळा झाले त्यात कोणाचा सहभाग आहे हे देखील तपासून पहावे लागणार आहे.ज्यांनी कोणते गैरव्यवहार केले नाही त्यांनी तपास यंत्रणेस घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.