आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणे करणार पुण्यातील मेट्रो स्थानकावर योगा:आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी प्रत्येक मंत्रालयाला एक स्थान

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी आंतराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त केंद्र सरकार देशाच्या विविध भागात विशेष योग उत्सव साजरा करत आहे. देशातील विशेष व ऐतिहासिक अशा 75 स्थानांची यासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मंत्रालयाला एक स्थान देण्यात आले आहे. पुण्यामध्ये केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये योग उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर या योगोत्सवाचे 21 जून रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, महाराष्ट्रचे संचालक पी. एम. पारलेवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.

सोपे योग सत्र

फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर सकाळी 6.30 ला या योगोत्सवाचे व माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे तर्फे आयोजित तीन दिवसीय योग व योगगुरुंबद्दल माहिती देणारे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर 6.40 ते 7.00 वाजेपर्यंत म्हैसूर, कर्नाटक येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थित नागरिकांसाठी होईल. त्यानंतर 7.00 ते 7.45 या वेळात सामान्य योग सत्र म्हणजेच नियमित सोपे योग सत्र घेण्यात येईल.

मोफत प्रवास सोय

कार्यक्रमासाठी एक हजाराहून अधिक नागरिक उपस्थित राहू शकतील असे नियोजन करण्यात आले असल्याचे पारलेवार यांनी यावेळी सांगितले. प्रथम येणाऱ्या एक हजार नागरिकांना फुगेवाडी ते पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि परत असा मोफत प्रवास दिला जाणार आहे. पुण्यातील नागरिकांसाठी ऐतिहासिक नव्हे तर आधुनिक व सार्वजनिक अशा ठिकाणी योग दिन आयोजित करत आहोत, ज्याच्याशी नागरिकांचा नव्याने परिचय होत आहे, याबद्दल आनंद असल्याची भावना डॉ. सत्यलक्ष्मी यांनी व्यक्त केली.

प्रात्यक्षिक होणार

वाहनतळ, प्रवेश व तिकीट मजला तसेच प्रत्यक्ष मेट्रो प्लाटफॉर्म अशा तीन मजल्यांवर 21 जून रोजी फुगेवाडी मेट्रो स्टेशनवर सहभागी नागरिकांसह योग सराव/प्रात्यक्षिक होणार आहे. या सर्व नागरिकांसाठी योगा मॅट, सात्विक अल्पोपहार याची व्यावस्था राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे करण्यात अली आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. के सत्यलक्ष्मी यांनी यावेळी दिली

बातम्या आणखी आहेत...