आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली 'दगडूशेठ' गणपतीची आरती; ट्रस्टसह सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे सन्मान

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी रात्री उशिरा श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे हेमंत रासने, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी उत्सवमंडपात उपस्थित महाराष्ट्रातील वारक-यांसोबत टाळ हातात घेऊन 'रामकृष्ण हरी' चा गजर देखील केला.

दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात येऊन दत्तमहाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आरती देखील केली. ट्रस्टतर्फे त्यांना महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

हे गणराया राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे - नाना पाटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही गुरुवारी रात्री दगडूशेठ गणपतीच दर्शन घेतलं यावेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री विश्वजित कदम, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे माजी आमदार दीप्ती चवधरी ,काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदीही उपस्थित होते दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने नाना पटोले यांच्या स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने आदी यावेळी उपस्थित होते.

देशात कृत्रिम महागाई वाढवली गेली आहे ,खाजगीकरणाच्या निमित्तानं कृत्रिम बेरोजगारी वाढवली जातीये देशातला राज्यातला बळीराजा सुखी नाही तो आत्महत्या करतोय या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणावं आणि सद्बुद्धी द्यावी दगडूशेठ गणपती चरणी केल्याचं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

बातम्या आणखी आहेत...