आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:पुण्यात हवेतील बस सुरू करणार, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील चांदणी चाैक येथील रस्त्याच्या कामाची शुक्रवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला. चांदणी चाैकातील रस्त्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली व अधिकाऱ्यांना गतीने काम पूर्णत्वास नेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील दाेन ते तीन दिवसांत चांदणी चाैकातील उड्डाणपूल पाडण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुण्यात हवेतील बससेवा सुरू करण्याची घोषणाही गडकरींनी केली आहे. गडकरी म्हणाले, पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरात वाहतूक वाढत आहे. त्यामुळे इलिव्हेटेड दुमजली रस्ते बांधण्याबाबत काम करण्यात येत आहे. पुण्याच्या रिंगराेडसाठी भूसंपादनकरिता १३ हजार काेटी रुपये लागत आहेत. यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे माजी महापाैर, मनपा आयुक्त यांना चार ते पाच प्रस्ताव मी दिले आहेत.

पुणे बंगळुरू साडेचार तासांत : पुणे-बंगळुरू ग्रीन फील्ड हायवे आणि पुणे-अहमदनगर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. पुणे ते अहमदनगरचे आवश्यक भूसंपादन आम्ही करणार आहाेत. सुरत-नाशिक-अहमदनगर-साेलापूर- चेन्नई-बंगळुरू-हैदराबाद-काेची असा नवीन महामार्ग आम्ही बांधत आहाेत. उत्तर भारतातून दक्षिणकडे येणारी वाहतूक प्रथम सुरतला येऊन नंतर महाराष्ट्राकडे येते. ही वाहतूक मुंबई, पुण्याकडे न येता दुसऱ्या मार्गाने वळवून हवेचे प्रदूषणही राेखण्यात येईल.

मुंबई ते बंगळुरू अंतर साडेचार तासांत तर पुणे ते बंगळुरू अंतर साडेतीन तासांत पूर्ण हाेईल, असे काम करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातून हा मार्ग जाणार असून त्या भागाचा विकास याद्वारे हाेईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

पुणे ते शिरूर जुना रस्ता तीनमजली होणार पुणे ते शिरूर आणि अहमदनगर ते औरंगाबाद या जुन्या रस्त्यावर तीन मजली इलिव्हेटेड रस्ता बांधणी करण्यासाठी डिझाइनचे काम करण्यात आले. तळेगाव दाभाडे ते शिरूर यादरम्यानही अशाच प्रकारे रस्ता तयार केल्यास मुंबईवरून येणारी वाहतूक वळवता येईल. नाशिक फाटा ते खेड या रस्त्याच्या कामाची मी पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गडकरींच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वपूर्ण मुद्दे - पालखी मार्गाचे काम गतीने सुरू असून डिसेंबरमध्ये चार व पाच मार्गिकांचे उद्घाटन - पुणे ते सातारा महामार्गाचा पुन्हा डीपीआर, खंबाटकी घाटातील बाेगद्यातील एक लेन जूनमध्ये सुरू - पुण्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा विचार - १६५ राेप-वे बस अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चालवणार, सार्वजनिक वाहतुकीसाठी केबल बस सुरू

बातम्या आणखी आहेत...