आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात शंभर टक्के परिवर्तन होईल आणि भाजपचे कमळ फुलेल, असा दावा केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री पटेल हे आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्त पुण्यातील भोर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल म्हणाले की, जेव्हा विरोधक जिंकतात, तेव्हा ते गप्प राहतात आणि जेव्हा ते निवडणुका हरतात, तेव्हा ते ‘ईव्हीएम’चा मुद्दा पुढे करतात. संजय राऊतांना विचारा की जेव्हा तुम्हा जिंकता, तेव्हा मशिन आमच्या ताब्यात नव्हत्या का? जेव्हा ते जिंकतात, तेव्हा गप्प राहतात आणि हरल्यावर मशिनमध्ये गडबड आहे, असा आरोप केला जातो.
पुढे केंद्रीय मंत्री पटेल म्हणाले की, संजय राऊत यांच्या विधानावर मला काही बोलायचे नाही. भाजप सदैव आपले काम करत राहणार पक्ष आहे. त्यांना मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, उत्तराखंड आणि गुजरातच्या निवडणुकीची तर आठवण ठेवलीच पाहिजे. कारण गुजरात महाराष्ट्राच्या शेजारी आहे. या सर्व ठिकाणी भाजपने विजय मिळविला आहे.
मंत्री पटेल म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवरील तयारी केली आहे. शक्तीकेंद्र प्रमुखांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे. भोरमध्ये मी यापूर्वीही आलो होतो. जलजीवन मशिनच्या माध्यमातून आम्ही देशातील 60 टक्के परिवाराला पाणी देण्यात यशस्वी ठरलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त ‘हर घर जल’ देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार स्वातंत्र्याच्या शंभरीतही सर्वांना आज इतकेच पाणी मिळावे, यासाठी मोदी यांनी अमृत सरोवर बनविले. नदीजोड प्रकल्पाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला. देशातील तळ्यांमधील गाळ काढण्याच्या कामाला पुढील वर्षापासून सुरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. ज्या लोकांना सध्या पाणी मिळत आहे, त्यांनी पाण्याचे जलपुनर्भरण करावे. त्यामुळे पुढील पिढीसाठी सुद्धा पाणी उपलब्ध राहील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.