आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर:केळकर संग्राहलयाला दिली भेट; पुरातन वास्तूची माहिती घेत जतन, संवर्धनाबाबत केली चर्चा

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी रात्रीपासून पुणे दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी शुक्रवारी रात्री ऐतिहासिक केळकर संग्रहालय येथे भेट दिली. यावेळी संग्रहालयातील पुरातन वास्तूची माहिती घेऊन केळकर संग्रहालयात वास्तूच्या देखभालीविषयी त्यांनी चर्चा केली.

राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे चेअरमन सुदनवा रानडे यांनी गडकरी यांना केळकर संग्रहालय विषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी पुणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह माजी नगरसेवक अजय खेडेकर, कसबा भाजपा अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सतिश देसाई उपस्थित होते.

1962 मध्ये सुरू झालेले हे संग्रहालय हा पद्मश्री डॉ. डी. जी. केळकर यांचे खासगी संग्रहालय आहे. मानवी कारागिरीचे उत्तम नमुने गोळा करण्याच्या अंतःप्रेरणेने आणि पुढील पिढीसाठी ते जपण्याच्या हेतूने केळकर 60 हून अधिक वर्षे देशभर फिरले, आणि त्यांनी त्यांच्या सौदर्यदृष्टीला लोभवणाऱ्या आणि मनमोहक प्राचीन अशा वस्तू जमवल्या. संग्रहालयात 20 हजारहून अधिक वस्तू आहेत, त्यातील 2,500 वस्तू बघण्यासाठी मांडल्या आहेत.

जर्मन सरकारच्या 40 लाख रुपये अर्थसहाय्यातून संग्रहालयात ‘ग्रीन, क्लीन अँड स्मार्ट म्युझियम’ नुकतेच साकारला असून या प्रकल्पामुळे संग्रहालयातील सुविधांचे आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरण नुकतेच झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...