आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने बनवले अनोखे 'कुल PPE किट', आरोग्य कर्मचाऱ्यांचा आता त्रास कमी होणार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दीडवर्षापासून आरोग्य कर्मचारी जीवाची पर्वा ना करता कोरोना रुग्णांची सेवा करीत आहे . दिवस रात्र मेहनत घेणारे कर्मचारी आपल्या अथक प्रयत्नातून लोकांचे प्राण वाचावीत आहे. त्यातच डॉक्टरांना PPE किट घालून उपचार करावा लागतो. एकदा हे पूर्ण किट घातले तर आतमध्ये जराही हवा प्रवेश करु शकत नाही. त्यामुळे घामाने किटमधील व्यक्ती अक्षरशः भिजून जाते. मात्र आता पुण्यातील एका विद्यार्थ्याने या एक अनोखे PPE किट तयार केले आहे . पीपीई किटसाठी वेंटिलेशन सिस्टम तयार केल्याने हा PPE किट वातानुकूलित किट झाला आहे .

पुण्यातील निहाल सिंग असे या विद्यार्थ्यांचं नाव आहे . निहाल अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असून त्याने हा वातानुकूलित PPE किट बनवला आहे. निहालची आई डॉक्टर आणि भाऊ क्लिनिक मध्ये काम करत असल्यामुळे त्यांना होणार त्रास कमी करण्यासाठी त्याने काही तरी नवीन बनविण्याचे ठरविले .

मुंबईच्या के.जे. सोम्मया महाविद्यालयात शिकत आहे. करोनाकाळात काम करणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांना मदत करण्यासाठी निहालने ही भन्नाट कल्पना शोधून काढली आहे.

निहालने बनवलेली कोव्ह-टेक वेंटिलेशन सिस्टम ही पीपीई किटच्या आत बसवलेली असते. ती सभोवतालची हवा फिल्टर करुन आतमध्ये ढकलते. जेणेकरुन आपण पंख्याखाली बसल्यासारखे वाटते असे निहालने सांगितले सामान्यत: हवा जाण्यासाठी मार्ग नसल्याने पीपीई किटमध्ये गरम आणि दमट वातावरण तयार होतं. कोव्ह-टेकमुळे स्थिर हवेचा प्रवाह तयार होतो त्यामुळे किटमधील व्यक्तीची अस्वस्थतेतून सुटका होते. या सिस्टममध्ये लिथियम-आयन बॅटरी लावण्यात आली. ६ ते ८ तास चालते.

टेक्नोलॉजिकल बिझिनेस इनक्यूबेटर, रिसर्च इनोव्हेशन इनक्युबेशन डिझाईन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमुळे मला ही समस्या कळाली असे निहालने सांगितले.

पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे डॉ. उल्हास खरुल यांच्या मार्गदर्शनाने निहालने २० दिवसांत किटचे पहिले मॉडेल बनवले. डॉ. उल्हास यांच्या मार्गदर्शनामुळे हवेच्या प्रवाह गुणवत्तेमध्ये संतुलन साधण्यासाठी कोणत्या प्रकारचे फिल्टर वापरावे याची कल्पना आली. त्यानंतर निहालला भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजकता विकास बोर्ड (एनएसटीईडीबी) द्वारा मधीस सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या रिसर्च इनोव्हेशन इनक्युबेशन डिझाइन लॅबोरेटरी (आरआयआयडीएल) कडून मदत मिळाली. सहा महिन्यांहून अधिक प्रयत्नानंतर त्याने मानेभोवती उशीसारखी लावता येईल अशी यंत्रणा तयार केली. मात्र ही यंत्रणा त्रासदायक ठरत असल्याने आणखी लोकांची मदत घेत त्याने कमरेभोवती लावता येईल अशी वेंटिलेशन सिस्टम तयार केली. पुण्याच्या एका रुग्णालयात याची चाचणी केल्यानंतर ती यशस्वी ठरली आहे. जून महिन्यात एका कंपनीमार्फत याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाणार आहे. ५,४९९ इतकी याची किंमत असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...