आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे विद्यापीठाच्या गिर्यारोहण पदविकासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 12 जुलैपर्यंत अर्ज करता येतील.
गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग (GGIM), दक्षिण भारतातील पहिली गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग, उत्तरकाशी यांच्या संयुक्त विद्यमाने गिर्यारोहण विषयात एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम विकसित केला आहे. या पदविका कोर्सची पहिला वर्ग 2021-22 या शैक्षणिक वर्षात यशस्वीरित्या पूर्ण झाला. या पहिल्या तुकडीमध्ये 44 विद्यार्थ्यांचा समावेश होता. पहिल्या वर्षाच्या यशानंतर आणि या अभ्यासक्रमाला देशा-विदेशातून मिळालेल्या उत्तुंग प्रतिसादानंतर आता दुसऱ्या बॅचसाठी अर्थात शैक्षणिक वर्ष - 2022-23 साठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. हे प्रवेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेद्वारे घेता येतील. सदर प्रवेशपरीक्षेचे सर्व तपशील आणि परिपत्रके विद्यापीठाच्या तसेच GGIM च्या संकेतस्थळावर वर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
अनोखा अभ्यासक्रम
‘डिप्लोमा इन माउंटेनियरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स (DMAS) ’, हा GGIM द्वारे विकसित केलेला एक अनोखा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये प्रत्यक्ष पर्वतारोहण कौशल्ये, प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन, पर्वतातील जैवविविधता, मानवी शरीरविज्ञान, फिटनेस सायन्स, सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट, गिर्यारोहण व साहसी क्रीडा विषयक कायदेशीर बाबींचे सखोल ज्ञान, गिर्यारोहण आणि संबंधित क्षेत्रात करिअरच्या संधी आणि व्यावहारिक प्रशिक्षण या सर्वांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण गिरिप्रेमीचे अत्यंत अनुभवी गिर्यारोहक, मान्यताप्राप्त क्रीडाप्रशिक्षक आणि इतर संबंधित क्षेत्रातील नामवंत प्रशिक्षकांद्वारे दिले जाते. तसंच या कोर्सचा एक भाग म्हणून सर्व विद्यार्थ्यांना नेहरू इंस्टीट्यूट ऑफ माऊंटेनियरिंग येथून बेसिक माऊंटेनियरिंग कोर्स करता येईल आणि त्याचे प्रमाणपत्रदेखील मिळेल.
कोर्सचा तपशील असा
कालावधी - 1 वर्ष
सेमिस्टर - 2
एकूण गुण - 1200
एकूण क्रेडिट्स - 36
शिकवण्याची पद्धत - ऑनलाइन आणि ऑफलाइन
प्रात्यक्षिक सत्र
पात्रता - 18 - 55 (दोन्ही समाविष्ट) आणि कमीत कमी 12 वी पर्यंत शिक्षण
शारीरिक पात्रता - अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त
प्रवेश प्रक्रिया
अभ्यासक्रम सुरू होण्यापूर्वी अर्जदारांना ऑनलाइन प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. ही ऑनलाइन परीक्षा 100 गुणांची असून ती जुलै 2022 च्या अखेरीस होईल. प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम SPPU च्या शारीरिक शिक्षण विभागाच्या http://unipunedpe.in/ या वेबपेजवर उपलब्ध आहे. प्रवेश परीक्षेची अर्ज प्रक्रिया 15 जून ते 12 जुलै 2022 दरम्यान होईल. प्रवेश अर्ज कृपया पुढील संकेतस्थळावर भरावा: https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx या प्रवेश प्रक्रियेत आवश्यक ती मदत करण्यासाठी 9822323147 / 9284863609 / 8975398886 क्रमंकावर संपर्क साधा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.