आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune Crime Update | Pune Murder | The Husband Killed His Wife In Front Of Chimurdi While She Was Asking For A Drink; Tragic Incident In Pimpri Chinchwad

पत्नीला मुलीसमोरच केले ठार:दारू पिल्याचा जाब विचारल्याने पतीचे टोकाचे पाऊल; पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मद्यपान आणि बेरोजगारीमुळे एका उच्चशिक्षित तरुणाने त्याच्या तीन वर्षांच्या मुलीदेखत पत्नीचा जीव घेतल्याची खबळळजनक घटना पिंपरी चिंचवड परिसरात उघडकीस आली. विशेष म्हणजे पतीने या खूनाची माहिती स्वत: पोलिस कंट्रोलला फोन करत दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत त्याला शनिवारी बेड्या ठोकल्या.

दारू पिऊन यायचा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवम पंकज पचौरी उर्फ भारद्वाज (वय 32) असे आरोपीचे नाव आहे. तर अवंतिका शर्मा (वय 30) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. दोघांनाही तीन वर्षांची मुलगी असून तिच्या समोरच शिवमने अवंतिकाची गळा दाबून खून केला. शिवमला दारूचे व्यसन होते. तो नेहमी घरात दारू पिऊन यायचा. तसेच अवंतिकाशी वाद घालायचा. शिवम हा आयटी कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वी शिवम याची नोकरी गेल्याने तो बेरोजगार झाला होता.

भिंतीवर डोके आपटले

नोकरी गेल्याने शिवमचे दारू पिण्याचे प्रमाण वाढले होते. उच्चशिक्षित शिवम दररोज मद्यपान करून अवंतिकाला मारहाण करायचा. तसेच त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादही व्हायचे. दोन दिवसांपूर्वी शिवम मद्यपान करून घरी आला होता. त्यानंतर त्याचा पत्नी अवंतिकासोबत वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की, शिवमने अवंतिकाचे डोके आधी भिंतीवर, मग किचनवर आपटले. खाली पडल्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. हा सर्व प्रकार तो करत असताना त्यांची तीन वर्षांची चिमुकली तेथेच होती. ती रडत होती तरी सुद्धा त्याने अवंतिकाचा खून केला. शुद्धीवर आल्यावर त्याने पोलीस कंट्रोलला फोन करून घटनेची माहिती पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...