आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपी रोग निवारणासाठी 48 तासात लसीकरण करा:पशुसंशर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या सूचना

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात लंपी रोगाने डोके वर काढले आहे. या लंपी रोगाने अनेक जनवारांना बाधा झाली असून काहींचा यामध्ये मृत्यू देखील झाला आहे. असे असताना लंपी रोग निवारणासाठी 48 तासात लसीकरण करा असे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे.

असा आहे मृतांचा आकडा

लंपी चर्म रोग या गाई-म्हशींना होणाऱ्या विषाणूजन्य रोगाची साथ सध्या देशातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू - काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गोवा, आंध्र प्रदेश इ. राज्यात पसरली आहे. तर राज्यामध्ये जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक व जालना या 20 जिल्ह्यांमध्ये 310 गावांमध्ये लम्पी चर्म रोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. जळगाव जिल्ह्यातील 17, अहमदनगर जिल्ह्यातील 13, धुळे जिल्हयात 1, अकोला जिल्ह्यात 1, पुणे जिल्ह्यात 3, बुलडाणा जिल्ह्यात 3, अमरावती जिल्ह्यात 3 व वाशिम जिल्हयात 1 असे एकूण 42 बाधित पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

बाधित क्षेत्राच्या 5 किमी परिघातील 1566 गावातील एकूण 4,78,442 पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे व पुढील लसीकरण सुरू आहे. बाधित गावांतील एकूण 2,387 बाधित पशुधनापैकी एकूण 1,435 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत.

पशुसंवर्धन सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या सूचना

या पार्श्वभूमीवर राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या समवेत जळगाव, अकोला व औरंगाबाद जिल्ह्यातील लंपीचर्म रोगाने बाधित गावांचा दौरा करून पशुपालक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेवून सद्य स्थितीचा आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान त्यांनी पशुपालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उपचार, रोग नियंत्रणासाठी विभागाची यंत्रणा करीत असलेल्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेतला व पशुसंवर्धन विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.

लंपी चर्म रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लक्ष लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी सुमारे 1.25 लक्ष लसमात्रांचे वाटप पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राज्यात लंपी चर्म रोगाचा झपाट्याने प्रसार होतो आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिकाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी. जनजागृतीसाठी सामाजिक माध्यमांचाही (सोशल मिडियाचाही) वापर करावा. लंपी आजारावर उपयुक्त असणाऱ्या लस व औषधींची उपलब्धता जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी रू. 1 कोटी निधी उपलब्ध करून करावी, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील लम्पी रोगामुळे मृत्यूदराचे प्रमाण कमी राखण्या साठी संपूर्ण राज्यात बाधित क्षेत्राच्या 5 किमी परिघातील गायींना लसीकरण करण्यासाठी 10 लक्ष लस मात्रांची खेप प्राप्त झाली आहे. तरी अधिक गतीने लसीकरण करावे व रोग पूर्ण आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...