आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात लसीकरण:सीरम इन्स्टिट्यूटचे CEO अदर पूनावाला यांनी घेतली कोरोना लस, जिल्ह्यातील 31 केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लस घेणाऱ्या डॉक्टरांची प्रतिक्रिया : आम्हाला या लसीवर पूर्ण विश्वास, मनात कोणतीही शंका नाही

संपूर्ण देशाला कोरोनाची पहिली लस (कोव्हिशील्ड) देणाऱ्या पुण्यातही सकाळी साडे दहापासून 8 ठिकाणांवर लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. आज पुणे शहरात 8 आणि संपूर्ण जिल्ह्यात 31 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये डॉ. नानेश वाडेकर यांनी सर्वात पहिले लस घेतली. तर 'कोव्हिशील्ड'ची निर्माता अर्थात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनीही आज लसीचा डोस घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

जिजामाता रुग्णालयात लसीकरणासाठी त्यांच्या पाळीची वाट पहात असलेले वैद्यकीय कर्मचारी
जिजामाता रुग्णालयात लसीकरणासाठी त्यांच्या पाळीची वाट पहात असलेले वैद्यकीय कर्मचारी

जिजामाता रुग्णालयात प्रथम 10 मेडिकल स्टाफला लस मिळाली

पुण्यातील जिजामात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पवन साळवे यांनी दैनिक भास्करला सांगितले की, सकाळपासून लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची तयारी केली होती. आम्ही सर्वात आदी रुग्णालयातील 10 मेडिकल स्टाफ लस दिली आहे. येथे सर्वात आधी डॉक्टर गणेश जोशी यांनी डोस घेतला. लस दिल्यानंतर सर्वांना अर्ध्या तासात एका विशेष कक्षात ठेवले होते आणि कोणतेही लक्षण दिसून न आल्यानंतर घरी सोडले. लसीकरणाची प्रक्रिया संध्याकाळपर्यंत पाचपर्यंत सुरू राहणार आहे.

पुण्यातील नेहरू रुग्णालयात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लसी कक्षाचे उद्घाटन झाले.
पुण्यातील नेहरू रुग्णालयात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लसी कक्षाचे उद्घाटन झाले.

पहिली लस घेणाऱ्याने सांगितले - याबद्दल काहीही शंका नाही

या प्रक्रियेचा भाग झालेले डॉ. जोशी म्हणाले की, आम्हाला या लसीवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही आधीपासूनच त्याचे संशोधन आणि सर्व प्रक्रियांबद्दल वाचत आलो आहे. मनात कोणतीही शंका नाही. मी लस घेत आहे त्यामुळे मला चांगले वाटत आहे. मला या लसीवर विश्वास आहे आणि ती घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत.

एका बूधवर 100 कर्मचाऱ्यांना डोस

पुण्याच्या महापौरांनी सांगितले की, एका बूथवर 100 कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. सध्या पुणे शहरासाठी 48 हजार डोस मिळाले आहेत. येत्या काळात संपूर्ण पुण्यासाठी 96 लाख डोसची आवश्यकता असेल. त्यासाठी योजना आखली जात आहे.

या 8 ठिकाणी लसीकरण केले जात आहे

राजीव गांधी रुग्णालय

कमला नेहरू रुग्णालय

रूबी हॉल क्लिनिक

बी जे मेडिकल कॉलेज तसेच ससून रुग्णालय

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

भारती रुग्णालय

नोबेल रुग्णालय

कै जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतिगृह, कोथरुड

बातम्या आणखी आहेत...