आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सीरमनिर्मित ऑक्सफर्डच्या कोरोना लसीचे दोन डोस पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना एक हजार रुपयांत उपलब्ध होणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिल्लीत दिली. तसेच कोविड योद्धे व ज्येष्ठ नागरिकांना फेब्रुुवारीअखेर, तर सर्वसामान्य नागरिकांना एप्रिलअखेर लस उपलब्ध होईल, अशीही घोषणा त्यांनी या वेळी केली.
तथापि, प्रत्येक भारतीयाला लस मिळण्यास आणखी तीन ते चार वर्षे म्हणजेच २०२४ हे साल उजाडण्याची शक्यता आहे. यामागे लसीचा पुरवठा हे एकमेव कारण नाही. शासनाची आर्थिक तरतूद, लस साठवण, वाहतूक आणि नागरिकांची इच्छा आदी सर्व घटकांमुळे इतके वर्षे लागण्याची शक्यता आहे. तसेच भारतात ही लस मोठ्या प्रमाणात लागणार असल्याने त्याची किंमत आणखी कमी करू शकतो, असेही पूनावाला यांनी या वेळी संकेत दिले.
मुलांना न्यूमोनिया, गोवरच्या तुलनेत कोरोनाचा कमी धोका
पहिल्या टप्प्यात कोरोना वॉरियर, ज्येष्ठांनाच लस दिली जाईल. सुरक्षिततेचा अहवाल आल्यावरच मुलांनाही ती देता येईल. चांगली बाब म्हणजे, मुलांना न्यूमोनिया, गोवर या आजारांच्या तुलनेत कोरोनाचा कमी धोका आहे. परंतु ते कोरोनाचे वाहक बनू शकतात.
फेब्रुवारीपासून दरमहा १० कोटी डोस बनवणार
फेब्रुवारीपासून कोरोनाचे दरमहा १० कोटी डोस तयार होतील. ते २ ते ८ अंश सेल्सियस तापमानात स्टोअर केले जाऊ शकतात. ते भारतील लस साठवण केंद्रातील तापमानाशी अनुकूल आहे. भारताला किती डोस पुरवले जातील याबाबत बोलणी चालू आहे. अद्याप करार झाला नसल्याचेही पूनावालांनी स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.