आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे. मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही, याची जबाबदारी आमची राहिल असे सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे काढले नाही, अन्यथा त्यांच्या भोग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावा, असे आदेश राज ठाकरेंनी दिला होता. यावेळी बोलताना महाविकास आघाडीने राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणीही सुजात आंबेडकर यांनी केलीय.
नेमके काय म्हणाले सुजात आंबेडकर?
राज ठाकरे यांच्या वक्तव्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यातच सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे. यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही. आता त्यांची जबाबदारी आमची आहे. उच्चवर्गीय ब्राह्मण बहूजनांच्या पोरांना भडकवण्याचे काम करताय असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला आहे. जरा वेळ पडलीच तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल असेही म्हणाले. अमित ठाकरेंना हनुमान चालीसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना सांगण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? असा सवाल त्यांनी राज ठाकरेंना केला आहे.
राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मविआला संधी
मविआने पुरोगामीत्वाची चादर पांघरलीय, तर त्यांना राज ठाकरेंवर कारवाई करण्याची संधी आहे. मविआने राज ठाकरेंवर कारवाई करावी अशी मागणी सुजात आंबेडकर यांनी केली आहे. मशिदीच्या बाजूला भोंगे लागतील या वक्तव्यावर आक्षेप आहे, कारवाई व्हायला हवी. संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करु नका, असे वक्तव्यही सुजात आंबेडकर यांनी केले आहे.
सुजात आंबेडकर यांचे अमित ठाकरेंना आव्हान
राज ठाकरेंच्या वक्तव्याला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे. फक्त एक गोष्ट आहे. तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा. मला एखही बहुजन पोरगा तिकडे नकोय. जे कोणी तिकडे हनुमान चालीसा म्हणायला जात आहे. त्यांनी टी शर्ट काढून जानवे दाखवून आतमध्ये प्रवेश करावा, मग हनुमान चालीसा म्हणावी असे आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.