आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

एल्गार प्रकरण:वरवरा राव यांना कोरोना, प्रकृती स्थिर, जेजेतून कोविड रुग्णालयात हलवले

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या आठवड्यात राव तळोजा कारागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळले हाेते

पुण्यातील एल्गार परिषद आयोजनप्रकरणी बंदी घातलेल्या माओवाद्यांच्या संघटनेशी संबंधांचा अारोप असलेले कवी वरवरा राव (८१) यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती जेजे रुग्णालयाने दिली. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास नाही. आता त्यांना विशेष कोविड रुग्णालयात हलवण्यात येत आहे,’ असे जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. रणजित माणकेश्वर यांनी सांगितले. 

गेल्या आठवड्यात राव तळोजा कारागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळले हाेते. त्यांना चांगल्या रुग्णालयात हलवण्यात यावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानंतर राव यांना जेजे रुग्णालयात भरती केले होते. नातेवाइकांनी त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीन देण्यात यावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयासमोर केली आहे.

0