आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

एल्गार प्रकरण:वरवरा राव यांची प्रकृती ढासळली, कारागृहातून रुग्णालयात हलवा; कुटुंबीयांची मागणी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वरवरा राव दोन महिन्यांपासून आजारी आहेत

एल्गार परिषद व कोरेगाव-भीमा प्रकरणातील संशयित आरोपी कवी वरवरा राव न्यायालयीन कोठडीत असून त्यांची प्रकृती ढासळली असून त्यांना लवकरात लवकर चांगल्या रुग्णालयात भरती करण्यात यावे, अशी मागणी राव यांच्या कुटुंबीयांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे.

राव यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देण्यासाठी कुटुंबीयांच्या वतीने ऑनलाइन पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात होते. त्या वेळी राव यांच्या पत्नी पी. हेमलता, मुलगी पी. पवना, पी.अनाला, पी. सहजा उपस्थित होत्या. वरवरा राव दोन महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार करण्यात येत अाहेत. हे उपचार पुरेसे नसून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राव यांना साधं बोलतासुद्धा येत नाही. त्यांचा जामीन अर्ज आतापर्यंत ५ वेळा फेटाळण्यात आला आहे. सध्या जामिनाचा विचार न करता त्यांच्यावर जे. जे. सारख्या चांगल्या रुग्णालयात उपचार व्हावेत, अशी मागणी पत्नी हेमलता पत्रकार परिषदेत केली.

0