आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामौजमजा करण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून वाहनचोरी करणार्या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती गुरवारी दिली आहे. त्याच्याकडून सात दुचाकी आणि एक रिक्षा अशी साडेचार लाखांवर किंमतीची वाहने जप्त करण्यात आली आहे. राजेश प्रकाश परळकर (वय ३०, रा. सुखसागरनगर, कात्रज,पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
वाहनचोरी रोखण्याच्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलिस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एका रिक्षाचालकाचा संशय पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, राहुल तांबे, निलेश ढमढेरे यांना आला. पथकाने राजेश परळकर याला ताब्यात घेतले. त्याने ताब्यातील रिक्षा चोरीची असल्याची कबुली दिली.
अधिक चौकशीत त्याने भारती विद्यापीठ, सहकारनगर, हडपसर, जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ७ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, एपीआय अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, अभिजीत जाधव, राहुल तांबे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, विक्रम सावंत, अशिष गायकवाड यांनी केली आहे.
धारदार हत्याराने वार, तिघांना अटक
पुर्वीचा राग मनात धरून सौरभ गायकवाड याला का मारले असा जाब विचारून चार जणांच्या टोळक्याने एकावर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी करणार्या तिघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली.
ऋतीक घाडगे उर्फ दिघ्या (20), आदित्य उर्फदिनेश युवराज ओव्हाळ (21), सागर कल्याण माने (24), रूपेश दिगंबर जगताप (21, सर्व रा. गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबत सनि सपकाळ (25, रा. कोरेगाव पार्क,पुणे) याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार तीन जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे अशी माहिती पोलिसांनी गुरवारी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.