आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद बातमी:ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाऱ्यावरची वरात नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती.

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरी त्यांची प्राण ज्योत मालावली. वाऱ्यावरची वरात नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे आणि प्रिया मराठे असा परिवार आहे. 6 नोव्हेंबर 1929 रोजी किर्लोस्करवाडी येथे त्यांचा जन्म झाला होता.

श्रीकांत मोघे यांनी साठपेक्षा अधिक नाटके आणि पन्नासपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'पुलकित आनंदयात्री' या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला आहे.

मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे झाले होते. तर महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजमध्ये झालेले होते. बीएस्सीसाठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजामध्ये गेले होते. मुंबईत त्यांननी बी.आर्च. ही पदवी घेतलेली आहे. शाळेत असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळाले होते.

बातम्या आणखी आहेत...