आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन वार्ता:ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या संवेदनशील आणि प्रगल्भ अभिनयाने हिंदी-मराठी रंगभूमी, चित्रपट आणि छोट्या पडद्यावर ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर (७९) यांचे दीर्घ आजाराने येथे निधन झाले. त्या अविवाहित होत्या. त्यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, वहिनी व भाचा आहे. पुण्यात त्या बहिणीसोबत वास्तव्यास होत्या.

राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) त्या अत्यंत गाजलेल्या विद्यार्थिनी आणि नंतर अध्यापक. अल्काझी यांच्या तालमीत त्या घडल्या. हिंदी रंगभूमीवरचा सुवर्णकाळ त्यांनी अनुभवला आणि स्वतः:चे योगदान दिले. ‘अंधायुग’मधील गांधारी ही त्यांची भूमिका विलक्षण गाजली. प्रायोगिक रंगभूमीसाठी त्यांनी खूप कार्य केले. उत्तरा बावकर या ‘तमस’ या मालिकेमुळे प्रकाशझोतात आल्या. सुमित्रा भावे यांच्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले होते.