आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानवरील विजयाचा उत्सव:'विजय दिवस'च्या पार्श्वभूमीवर तरुणांनी सुमद्रात फडकवला 321 फूट लांब तिरंगा, 1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा केला होता पराभव

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • समुद्रात 321 फूट लांब ध्वज फडकवण्याचा हा पहिलाच प्रयत्न

भारतात 16 डिसेंबर 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 1971 मध्ये भारताने पाकिस्तानचा युद्धात पराभव केला होता. या युद्धानंतर पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) पश्चिम पाकिस्तानपासून वेगळा झाला होता. 16 डिसेंबर रोजी 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्करासमोर गुडघे टेकून आत्मसमर्पण केले होते. याच विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर 41 युवकांनी मंगळवारी (15 डिसेंबर) मुंबईच्या समुद्रात 321 फूट लांब तिरंगा फडकवला.

पुण्याच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या 41 सदस्यांनी तारकर्ली मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात हा कारनामा केला आहे. समुद्रात 321 फूट लांब ध्वज फडकवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. यावेळी सर्वांनी भारत माता की जय घोषणाबाजी केली.

लिम्का आणि गिनीज बुकला पाठवणार व्हिडिओ

डोंगर ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव म्हणाले की, "16 डिसेंबर हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे आणि यामुळेच सुमद्रात इतका मोठा तिरंगा फडकवण्याचा आम्ही विचार केला." दरम्यान डोंगर ग्रुप याचा व्हिडिओ लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सला पाठवणार आहेत.

स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या झाली 4 युद्ध

देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात बरीच युद्धे झाली होती, पण 1971 आणि 1999 मध्ये झालेले कारगिल युद्ध सर्वांनाच आठवते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1947, 1965, 1971 आणि 1999 मध्ये युद्ध झाले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser