आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांचीतून तरुणाला अटक:दिग्गजांचे छायाचित्र केले मार्फ, फेसबूक अकाउंट हॅक करायचा पण शेवटी पोलिसांच्याच गळाला लागला

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडे फोटो मार्फ करुन महिलांची बदनामीचा प्रकार घडत असतानाच आता मोठे नेत्यांचे फोटो मार्फ केले जात आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड येथे उघडकीस आली आहे. मोठ-मोठ्या नेत्यांचे व्हिडीओ मार्फ करणे आणि फेसबूक अकाउंट हॅक करणे एका व्यक्तिला चांगलेच महागात पडले. पुणे पोलिसांनी परराज्यात जाऊन या संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

शमीम जावेद अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो झारखंडच्या रांचीचा रहिवासी आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवडमधील राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर तब्बल तीन महिने तपास करून सायबर पोलीस शमीमपर्यंत पोहोचले आहेत.

या नेत्यांचे व्हिडीओ केले मार्फ

प्राप्त माहितीनुसार, संशयिताने अनेक राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र मार्फ केले आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांचे फोटोंचा समावेश आहे.

रांचीतून ठोकल्या बेड्या

व्हिडीओ मॉर्फ करणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. देशातील बड्या नेत्यांची बदनामी करणाऱ्या या विकृताला थेट रांचीतून अटक करण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली.

..तर सावधान!

व्हिडीओ-फोटो मॉर्फ करणे, अचानक व्हिडीओ कॉल करून अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करणे. अकाउंट हॅक करून फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास घडतात. अशांनी सायबर विभागाकडे तक्रारी केल्यास त्यांची ही यातून सुटका होऊ शकते.

काय आहे मार्फिंग

मॉर्फिंग हे प्रतिमा संपादित करण्याचे तंत्र आहे. यामध्ये एकाच चित्राला अनेक प्रकारे दोन किंवा अधिक चित्रे एकत्र करून अधिक चांगले किंवा वेगळे रूप दिले जाते. हे काम इतक्या बारकाईने केले जाते की नंतर पाहणार्‍याला हेही कळत नाही की दोन चित्रे एकत्र केली आहेत.

मोशन पिक्चर्समध्ये मॉर्फिंगचा वापर आधीपासूनच केला जात होता, परंतु 1990 च्या दशकात संगणकाच्या आगमनाने ते अधिक सामान्य झाले. पण आज ते मोबाईलमध्येही असल्याने या तंत्राचा वापर करुन अलीकडे गैरप्रकारही होऊ लागले आहेत.