आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांचे पेनड्राइव्ह प्रकरण:भिंतीवरील घड्याळात कॅमेरा बसवून व्हिडिओ रेकॉर्डिंग केले, सरकारी वकिलाचा जळगावातील व्यक्तीवर संशय

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यांपूर्वी जळगावातील एका व्यक्तीने आपणास भिंतीवरील घड्याळ भेट दिले होते. या घड्याळात छुपा कॅमेरा असावा आणि त्याद्वारे व्हिडिओ रेकाॅर्डिंग करण्यात आले असावे, असा संशय विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. चव्हाण यांनी अंगुलिनिर्देश केलेला व्यक्ती तेजस मोरे असल्याचा संशय असून तो जळगावचा रहिवासी आहे.

महाविकास आघाडी सरकारने आपल्याला व भाजप नेते गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी कटकारस्थान रचले असल्याचा आरोप करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरलेल्या आठवड्यात विधानसभेत पेनड्राइव्ह सादर केला होता. यात सव्वाशे तासांचे व्हिडिओ संभाषण असून हे सर्व कारस्थान सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या पुणे येथील कार्यालयात झाल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्हिडिओ रेकाॅर्डिंगमध्ये छेडछाड करण्यात आली असून त्याची चाैकशी करण्याची मागणी चव्हाण यांनी या वेळी केली आहे.

या वेळी बोलताना त्यांनी आपल्या कार्यालयातूनच व्हिडिओ रेकाॅर्डिंग झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिस काय भूमिका घेतात, याकडेही सत्ताधारी पक्षासह विरोधकांचे लक्ष लागले आहे.

कोण आहे तेजस मोरे?
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप असणारा तेजस मोरे हा तरुण जळगावच्या जिल्हा परिषद कॉलनीतील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध जळगावच्या शहर पोलिस ठाण्यात सन २०१९ मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल असून न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. संत ज्ञानेश्वर कॉलनीतील रहिवासी विलास शांताराम आळंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तेजस मोरे याने आळंदे यांचा मुलगा स्वप्निल याच्या नावावर ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले. हे पैसे मागू नये म्हणून तेजस याने धीरज पाटील, गणेश महाले व सुजाता ठाकूर यांच्या मदतीने विलास आळंदे यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी व कटकारस्थान केले. वृत्तपत्रात खोटे वृत्त प्रसिद्ध केले. ही सर्व प्रकरणे मिटवण्यासाठी अमोल कोल्हे यांच्या मध्यस्थीतून तेजस मोरे याने विलास आळंदे यांना पंधरा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...