आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:मैत्रिणीवर अत्याचार करून ग्रुपवर व्हिडिओ व्हायरल, मित्र अटकेत; शाळेच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात झाली पुनर्भेट

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तक्रारीनंतर डांगीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी काही तासातच त्याला अटक केली.

शालेय जीवनापासून ओळख असलेल्या विवाहित मैत्रिणीवर बलात्कार करून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडिया चॅटिंग ग्रुपवर पाठवणाऱ्या मित्रास सहकारनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश असुलाल डांगी ( ४१, रा. शिल्पतारा सोसायटी, आंबेगाव पठार, पुणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला आणि डांगी हे काही वर्षांपूर्वी एकाच शाळेत होते. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात त्यांची पुन्हा भेट झाली. या वेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एक चॅटिंग ग्रुप तयार केला. या माध्यमातून त्याने पीडित महिलेशी जवळीक वाढवली. त्यानंतर दोघांत बोलणे सुरू झाले.

काही दिवसांनंतर त्यांच्या भेटीही सुरू झाल्या. याचाच फायदा घेत डांगी याने मैत्रिणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या घटनेचे त्याने व्हिडिओ रेर्काडिंग करून शालेय मित्रांच्या ग्रुपवर पाठवले. महिलेला हा प्रकार समजल्यानंतर तिने तातडीने पोलिसांत तक्रार दिली. तसेच आपली कुटुंब आणि समाजात मोठी बदनामी झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनंतर डांगीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी काही तासातच त्याला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...