आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यातील घटना:​​​​​​​तडीपार गुंडाचा हातात कोयता घेऊन डान्स, शिवजयंतीला केला दहशत पसरवण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा व्हिडिओ सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरातील हा व्हिडिओ समोर आले.

तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे समोर आले आहे. तसेच शिवजयंतीच्या दिवशीची ही घटना असल्याची माहिती आहे. गुंड रोशन लोखंडे याने हातात कोयदा घेऊन दहशत निर्माण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये गुंड रोशन लोखंडे हा त्याच्या साथीदारांच्या खांद्यावर बसेलाल दिसत आहे. यावर तो डान्स करत आहे. एवढेच नाही तर रोशनसोबत नाचणाऱ्या एका गुंडाच्या हातात पिस्तुल असल्याचेही दिसत आहे. हा व्हिडिओ सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरातील हा व्हिडिओ समोर आले. तसेच शिवजयंतीच्या दिवशी हा प्रकार घडला होता.

तडीपार करण्यात आलेला गुंड हातात कोयदा घेऊन नाचत असल्याये या व्हिडिओमध्ये दिसतेय. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रोशन लोखंडे याच्याविरोधात शस्त्र जवळ बाळगणे, दरोडा अशा प्रकारचे गंभीर गुन्हे यापूर्वीच दाखल करण्यात आले आहे. रोशनला यापूर्वी तडीपार केले होते. त्याला दुसऱ्या वेळी तडीपार करण्यात आलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...