आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंवेदनशील अभिनेत्री अशी ओळख निर्माण करणारी विद्या बालन आणि ती मांडणार असलेले विचार, हे यंदाच्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे (पिफ) वैशिष्ट्य आहे. 8 फेब्रुवारी रोजी विद्या बालन 'चॅलेंजेस ऑफ फीमेल अॅक्टर्स इन दि एन्टरटेन्मेन्ट वर्ल्ड ' या विषयावर मनोगत व्यक्त करणार आहे, अशी माहिती पिफचे संचालक डाॅ जब्बार पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादीही जाहीर करण्यात आली. विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेत यावर्षी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचे ‘लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता हे देखील या वेळी उपस्थित होते.
यंदा 2 ते 9 फेब्रुवारी, 2023 दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मुकुंदनगर येथील थिएटर अकादमी, सकल ललित कलाघर या ठिकाणी गुरुवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सायं 5.30 वाजता महोत्सवाचा उद्घाटन समारंभ तर गुरुवार दि. 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता महोत्सवाचा समारोप समारंभ संपन्न होईल, असेही डॉ. पटेल यांनी सांगितले.
पिफची वैशिष्ट्ये अशी
अली अब्बासी दिग्दर्शित ‘होली स्पायडर’ यावर्षीची ‘ओपनिंग फिल्म’
‘फायनल कट’ ही दिग्दर्शक मिशेल हाजानाविसियस यांची फिल्म ‘क्लोजिंग फिल्म’
श्रीकर प्रसाद यांचे ‘दी इंव्हिजिबल आर्ट ऑफ फिल्म एडिटिंग’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान
दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर शाजी करून यांचे ‘थिंकिंग इमेजेस’ याविषयावर मार्गदर्शन
दिग्दर्शक राहुल रवैल यांचा ‘मेनस्ट्रीम सिनेमा टूडे’ या विषयावर मास्टरक्लास
विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर ‘ह्युमर इन सिनेमा’ याविषयावर विचार मांडणार
दिग्दर्शक अरुणा राजे आणि लक्ष्मी लिंगम ‘मेकिंग फिल्म्स अँड वॉचिंग फिल्म्स: जेंडर इन हिंदी सिनेमा’ या विषयावर मार्गदर्शन
स्पर्धात्मक विभागात निवड झालेले मराठी चित्रपट
मदार (दिग्दर्शक – मंगेश बदार)
ग्लोबल आडगांव (दिग्दर्शक – अनिल कुमार साळवे)
गिरकी (दिग्दर्शक – कविता दातीर आणि अमित सोनावणे)
टेरेटरी (दिग्दर्शक – सचिन श्रीराम मुल्लेम्वार)
डायरी ऑफ विनायक पंडित (दिग्दर्शक – मयूर शाम करंबळीकर)
धर्मवीर; मुक्कम पोस्ट ठाणे (दिग्दर्शक – प्रवीण विठ्ठल तरडे)
पंचक (दिग्दर्शक – जयंत जठार आणि राहुल आवटे)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.