आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात प्रति एकनाथ शिंदे:विजयराजे माने हा तरुण मुख्यमंत्र्यांचा डुप्लिकेट; आज शिंदेंची भेटही घेणार

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय नेत्यांचे अनेक प्रकारचे चाहते असतात आणि हे चाहते आपल्या नेत्याचे अनुकरण करण्याचा अनेकदा प्रयत्न करत असल्याचा प्रकार घडताना आपण पाहताे. अशाचप्रकारे पुण्यातील एका तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा केली असून ताे आर्कषणाचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात कार्यक्रमासाठी येणार असून त्यांची भेट घेऊन त्यांच्यासाेबत भेट घेणार असल्याची माहिती प्रति एकनाथ शिंदे असलेला युवक विजयराजे माने याने साेमवारी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वाढवलेली चेहऱ्यावरील काळी दाढी मिशीची ठेवण, चष्माची पध्दत, कपाळावरील लाल गंधाचा टिळा, पांढरा शुभ्र सदरा आणि पँट आणि शर्टाचे खिशाला पेन अडकविण्याची पध्दत अशास्वरुपात वावरणाऱ्या विजयराजे माने याच्यासाेबत सेल्फी घेण्यास गर्दी हाेऊ लागली आहे. भारतीय जनता युवा माेचार्चा पुण्यातील पदाधिकारी असलेला विजयराजे माने हा एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसत असल्याने काही नागरिक त्याच्याकडे आपले प्रश्न साेडविण्यासाडी निवेदनही देऊ लागली आहे.

सुरुवातीला विविध रंगेबेरंगी कपडे दरराेज परिधान करणाऱ्या विजयराजे याने राजकीय सत्तानाटयानंतर राज्यात मुख्यमंत्री पदावर बसलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसत असल्याने त्यांच्यासारखी वेशभूषा ठेवावी असे मत त्याचे मित्र करु लागले. त्यामुळे विजयराजे याने मित्र व नागरिकांच्या विनंतीस मान देऊन मुख्यमंत्री यांच्यासारखे पांढरे शुभ्र कपडे परिधान करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विविध ठिकाणी फिरत असताना ताे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसत असल्याने त्याच्यासाेबत सेल्फी घेण्याकरिता तरुणाई गाेळा हाेऊ लागल्याचे चित्र आहे.

याबाबत विजयराजे म्हणाला, मला अतिशय आनंद आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात वेगाने काम करत आहे. ते जे काम करतात तेच काम माझ्याकडून सर्वसामान्य जनते पर्यंत जावे हाच माझा प्रयत्न आहे. सर्वसामान्य लाेकांच्या चेहऱ्यावर काम केल्यानंतर ताे आनंद आहे ताे मला पहावयास मिळताे.

माझ्यासाेबत सेल्फी घेऊन ते मुख्यमंत्री यांना भेटल्याचे सांगतात ही भावना उत्साह वाढवणारी आहे. अनेकांनी माझ्यासाेबत माेबाईलवर डीपी ठेवल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री यांच्याशी तुमची कशी भेट झाली अशी विचारणा ही हाेत अाहे. मला जाे चेहरा मिळाला त्याचा वापर सर्वसामान्यांचे कामासाठी व्हावा ही इच्छा आहे. माझा चेहरा मुख्यमंत्री यांच्यासारखा दिसणारा असून आधी मी रंगीत कपडे वापरत हाेताे. परंतु लाेकांनी मागणी केली तुमचा चेहरा मुख्यमंत्री यांच्यासारखा असल्याने पांढरे कपडे वापरा. त्यानुसार मी वेशभूषा केल्यावर लाेकांची प्रतिक्रिया वाखणण्याजाेगी आहे. पुण्यातील आं​​​​बेगाव पठार भागातून भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी मी उत्सुक आहे.

बातम्या आणखी आहेत...