आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Violation Of Fragmentation Law; Action Against 44 Officers, Revealed That Ten And A Half Thousand Cases Were Registered In Pune| Marathi News

अनियमितता:तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन; 44 अधिकाऱ्यांवर कारवाई, पुण्यात साडेदहा हजार दस्तांची नोंद केल्याचे उघड

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवेली तालुक्यात २७ दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये स्थावर मालमत्ता विकास आणि नियमन कायदा (रेरा) आणि तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मालमत्ता खरेदी-विक्रीचे बेकायदा दस्त नोंदवल्याचे उघड झाले आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार कारवाईची कार्यवाही सुरू करण्यात येऊन आतापर्यंत एकूण १२ जणांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शासननियुक्त समितीने केलेल्या तपासणीत हवेली तालुक्यातील २७ दस्त नोंदणी कार्यालयांत ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दहा हजार ५६१ दस्त नोंद केल्याचे समोर आले. याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. बेकायदा दस्त नोंदणीप्रकरणी यापूर्वीच चार अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आदेशानंतर ८ जणांचे निलंबन करण्यात आले. ९ जणांची विभागीय चौकशी सुरू असून बदलीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. ९ जणांची विभागीय चौकशी सुरू असून, ८ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ७ कनिष्ठ लिपिकांवर कारवाई करण्यात येत आहे, असे नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड यांनी स्पष्ट केले. रेरा कायद्यांतर्गत नोंद नसलेल्या प्रकल्पांमधील ४२४ सदनिकांची दस्त नोंदणी सन २०२०-२१ मध्ये झाल्याचे निदर्शनास आले. १० हजार ५६१ दस्त बेकायदा पद्धतीने नोंद झाल्याचे ताशेरे समितीने उघडकीस आणले.

अशी आहे शिक्षेची तरतूद
१. ज्यांनी ४०० ते १२८३ दस्त नोंदवले आहेत, त्यांना निलंबित करून विभागीय चाैकशी. दोषी अधिकारी- १२.

औरंगाबाद, नाशिकसह राज्यात नोंदणीच्या तक्रारी
नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर म्हणाले, पुण्यातील हवेली तालुक्यात २७ कार्यालयांत मागील एक ते दीड वर्षाच्या कालावधीत चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणीची चाैकशी करण्यात आली आहे. त्यांनी ११ (आय) नियमाचा भंग करत अनियमितता प्रकारे दस्त नोंदणी केल्याने ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अशाच तक्रारी डाेंबवली, कल्याण, आैरंगाबाद, नाशिक, कराड येथून आल्या आहेत.

निलंबित अधिकाऱ्यांची नावे
हवेली गट क्रमांक १४ वरिष्ठ लिपिक एल.ए.भाेसले, हवेली गट क्रमांक ६ वरिष्ठ लिपिक सतीश कुलकर्णी, हवेली गट क्रमांक २२ सबरजिस्ट्रार ए.के.नंदकर, हवेली गट क्रमांक ३ वरिष्ठ लिपिक अनिल गायकवाड, हवेली गट क्रमांक १६ दुय्यम निबंधक पाेपट भाेई, हवेली गट क्रमांक २७ दुय्यम निबंधक अजित फडतरे , हवेली गट क्रमांक ८ वरिष्ठ लिपिक केतन साळुंके, हवेली गट क्रमांक १३ वरिष्ठ लिपिक राजेंद्र मेहान, हवेली गट क्रमांक १२ वरिष्ठ लिपिक ए.व्ही. तारू यांचा समावेश आहे.

बारा अधिकारी-कर्मचारी निलंबित
५. ज्या कर्मचाऱ्यांनी नोंदवलेल्या दस्तांची संख्या १ आढळली आहे, त्यांच्याकडून खुलासा घेऊन प्रकरणपरत्वे ताकीद/साैम्य शिक्षा देण्यात येणार. दोषी कर्मचारी- ७
४. ज्यांनी नोंदवलेल्या दस्तांची संख्या २ ते १० आढळली, त्यांच्याकडून खुलासा घ्या. दोषी कर्मचारी- ७
२. ज्यांच्या दस्तांची संख्या १०० ते ३९९ आढळली, त्यांची बदली करून विभागीय चाैकशी. दोषी कर्मचारी- ९
३. ज्यांच्या दस्तांची संख्या ११ ते ९९ आढळली आहे, त्यांची विभागीय चाैकशी होणार- दोषी कर्मचारी- ९

मालमत्तांचे व्यवहार अनधिकृतच राहणार
ज्या दस्तांची नोंदणी ही एनए परवानगी न घेता, रेरा कायद्यानुसार रजिस्ट्रेशन न करता तसेच अधिकृत संस्थेकडून बांधकाम प्लॅन मंजूर न करता बांधकाम करण्यात आला आहे आणि केवळ रजिस्ट्रेशन शुल्क, स्टॅम्प डयूटी भरली गेल्याने त्याची केवळ नोंद राहणार असून त्या मालमत्तांचा व्यवहार अनधिकृतच राहणार आहे. तलाठी मालमत्ताबाबत फेराफार नोंद घेऊ शकत नाही. जिल्हाधिकारीच निर्णय घेतील.

बातम्या आणखी आहेत...