आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात फ्री स्टाइल हाणामारी:भररस्त्यात तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अद्याप याप्रकरणी दोन्ही गटांकडून कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही

पुण्यातील डेक्कन परिसरातील भिडे ब्रिजजवळ सोमवारी दुपारी तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. दोन्ही गटातील तरुणींनी एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. यावेळी तरुणींचे भांडण पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी तरुणींना हकलून लावले. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाव प्रचंड व्हायरल होत आहे.

भांडणामागचे कारण अद्याप अस्पष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणींचा एक गट एसपी महाविद्यालयातील आणि दुसरा ग्रुप मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचा होता. अद्याप दोन्ही ग्रुपकडून पोलिस तक्रार करण्यात आलेली नाही. या हाणामारीमागचे कारण अस्पष्ट आहे.