आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादृष्टीदोष असलेल्या भटक्या श्वानाला दांडक्याने बेदम मारहाण केल्याची वानवडीतील एका सोसायटीच्या आवारात घडली. या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.
मुन्ना शेख (रा. टेन स्क्वेअर सोसायटी, फातिमानगर, वानवडी,पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. शेख याच्या विरोधात प्राण्यांना क्रुरतेने वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण संजय गोव्रर(रा. टेन स्क्वेअर सोसायटी, फातिमानगर, वानवडी,पुणे) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
काय आहे घटना?
वानवडीतील फातिमानगर भागात टेन स्क्वेअर सोसायटीच्या परिसरात भटके श्वान आहेत. त्यापैकी टायसन नावाच्या एका श्वानाला दृष्टीदोष आहे. त्याला एका डोळ्याने कमी दिसते, असे ग्रोवर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.शेख याने टायसन नावाच्या श्वानाला दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत टायसन जखमी झाला. ग्रोवर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिस हवालदार एस कुंभार याबाबत पुढील तपास करत आहेत.
पीएमपीएल बसच्या धडकेत पादचारी जेष्ठ ठार
रस्ता ओलांडणार्या जेष्ठ पादचार्याला पीएमपीएल बसचालकाने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात अकरा डिसेंबरला रात्री साडेसातच्या सुमारास येरवड्यातील सादलबाबा दर्ग्याजवळ घडला.जनरलसिंग नंदसिंग बंगड (वय ६९ रा. जयजवानगर, येरवडा,पुणे) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपीएल बसचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. शेरील कपली (वय 33) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
उपचारादरम्यान मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरलसिंग हे 11 डिसेंबरला सादलबाबा दर्गा परिसरातून पायी चालले होते. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना भरधाव पीएमपीएल चालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत पुढील तपास येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन भगवान गुरव करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.