आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:अधिसभेसाठी आज 10 ते 5 पर्यंत मतदान ; पोलिसांची असणार सख्त सुरक्षा

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी रविवारी सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मतदान प्रक्रियेची सर्व तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली असून मतपेट्यांसह निवडणूक प्रतिनिधी आपापल्या केंद्रावर शनिवारी रवाना झाले आहेत. अधिसभेसाठी पदवीधरांमधून दहा उमेदवार निवडून दिले जाणार आहेत. पुणे, अहमदनगर आणि नाशिक व सिल्व्हासा येथे विद्यापीठातील २०० हून अधिक निवडणूक प्रतिनिधी, केंद्र निरीक्षकांच्या देखरेखीखाली तसेच पोलिसांच्या सुरक्षेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण, तसेच आवश्यक त्या सर्व प्रकारची खबरदारी विद्यापीठाकडून घेण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...