आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकऱ्यांच्या सेवेत पुणेकर:प्रथमच पाद्यपूजनाने स्वागत झाल्याने वारकरी भारावले

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर पुण्यात विसावलेल्या पालखी सोहळ्यांतील वारकऱ्यांच्या सेवेत सारे पुणेकर गुरुवारी रमल्याचे चित्र होते. निवडुंग्या विठोबा मंदिर आणि भवानी पेठ पालखी मंदिरात अनुक्रमे तुकोबा आणि माउलींचा पालखी सोहळा विसावला आहे. शुक्रवारी सकाळी दोन्ही पालख्या पुण्यातून हडपसरमार्गे पुढच्या वाटचालीसाठी मार्गस्थ होणार आहेत. अतिशय उत्साहात व आनंदात मोठ्या संख्येने वारकरी या वारीत सामील झाले आहेत.

यंदा पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे पाद्यपूजनासह चौरंगपाट, सुगंधी तेल, गुलाबपुष्प, स्वस्तिक, फुलांची रांगोळी असे शाही स्वागत करण्यात आले. या अनुभवाने वारकरी भारावले. यंदा आबा बागूल यांच्या वतीने शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात वारकऱ्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वधर्मीयांकडून वारकरी बांधवांच्या पायाला तेलाने मालिश करण्यात आली. त्याचबरोबर भारती आयुर्वेदिक हॉस्पिटलतर्फे सर्वरोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच वारकऱ्यांच्या सर्वसामान्य गोष्टी असलेल्या दाढी करणे, चप्पल-बुटांची दुरुस्ती ही करण्यात आली. त्यांची भजनासाठी उत्तम व्यवस्था व लसीकरणाची व्यवस्थादेखील श्री लक्ष्मीमाता मंदिरात करण्यात आली असल्याचे आबा बागूल यांनी सांगितले.

वारीत पावणेदाेन लाखाचे मंगळसूत्र चोरीला, : पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या ३ महिलांच्या गळ्यातील पावणेदाेन लाख रुपये किमतीचे माैल्यवान मंगळसूत्र चाेरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कल्पना गायकवाड, शालिनी मुसळे व ज्याेती रणधीर या तिघींनी विश्रांतवाडी ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आबा बागूल यांच्यावतीने यंदा वारकऱ्यांचे पाद्यपूजन करण्यात आले.