आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा42 वर्षीय महिलेला खासगी बाथरूममध्ये अंघोळ करताना पाहणार्या व नंतर तिचा पाठलाग करणार्या वॉर्ड बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशखिंड रोडवरील हर्डीकर हॉस्पीटल हा वार्ड कार्यरत आहे.
याबाबत एका 42 वर्षीय महिलेनी दिलेल्या फिर्यादीवरून वॉर्डबॉय आयाज शेख (25, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, खडकी) याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी त्यांच्या मुलाच्या हाताचे ऑपरेशन करण्यासाठी प्रायव्हेट रूम घेतली होती. त्या रूममधील बाथरूमध्ये आंघोळीसाठी त्या गेल्या असताना हॉस्पीटलमध्ये काम करणारा आयाज याने त्या ठिकाणी बेडशीट बदलण्यासाठी येऊन बेडशिट बदलुन झाल्यानंतर शेजारच्या रूमच्या जाळीतून महिलेला अंघोळ करताना पाहिले.
यानंतर तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याबाबत फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार चार जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर रविवारी यासंदर्भात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.