आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सुरू केलेल्या "स्थुलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व " अभियानातील स्वयंसेवकांनी वारीत सहभागी होऊन वारकऱ्यांना लठ्ठपणा आणि मधुमेह निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनाविषयी शुक्रवारी सकाळी मार्गदर्शन केले. या अभियानाच्या पायी वारीची सुरुवात गोळीबार मैदानाच्या जवळ असलेल्या धोबी घाटापासून सकाळी सहा वाजता सुरू करण्यात आली.
अभियानाची पत्रके वाटप
डॉ. दीक्षित आणि त्यांचे काही सहकारी पुणे ते सासवड असे पायी वारी करत असून या प्रवासात अभियानाची पत्रके वाटत आहेत. विसाव्याला थांबणाऱ्या वारकऱ्यांशी हितगुज करून त्यांना निरोगी जीवनशैली समजावून सांगितली जात आहे. सासवड येथे पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात 24 आणि 25 जूनला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत मोफत रक्त शर्करा तपासणी करण्यात येणार आहे.
मधुमेह पोस्टर प्रदर्शन
मैदानात उभारण्यात आलेल्या मंडपात मधुमेह विषयक पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अभियानाचे स्वयंसेवक तेथे वारकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बरोबरच 24 आणि 25 जूनला रात्री 8 वाजता डॉ. दीक्षित यांचे "जीवनशैली बदलातून वेट लॉस आणि मधुमेह मुक्ती" या विषयावर व्याख्यान वारकऱ्यांना होणार आहे. डॉ. दीक्षित यांची जीवनशैली अंगीकारणाऱ्या पुण्यातील सदस्यांनी या पायी वारीत सहभागी होत जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.