आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Warning Of Indefinite Strike By Rickshaw Pullers, RTO Files A Case Against The Officials Of The Bike Taxi Service Company In The State

रॅपिडोच्या विरोधात रिक्षाचालकांच्या बेमुदत बंदच्या इशारा:बाईक टॅक्सी सर्व्हिस देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर आरटीओकडून गुन्हा

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेकायदेशीररित्या अ‍ॅप सुरु करुन त्यामाध्यमातून ग्राहकांची बुकिंग घेऊन त्यांना बाईक टॅक्सी सर्व्हिस पुरवणे मे.राेपन ट्रान्सपाेर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि.( रॅपीडाे) कंपनीच्या अंगलट आले आहे. बाईक सर्व्हिस विराेधात पुण्यातील रिक्षाचालकांनी 28 नाेव्हेंबर पासून बेमुदत बंदचा इशारा दिला. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) गांभीर्याने दखल घेत, रॅपीडाे कंपनीचे संचालक जगदीश पाटील यांच्यासह इतरांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुणे आरटीओचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत रामराजे भाेसले (वय-38,रा.येरवडा,पुणे) यांनी पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पाेलिसांनी भादंवि कलम 418, माेटारवाहन अधिनियम 1988 चे कलम 66, 93, 192 अै, 146, 193, 197 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66 डी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात ऑनलाइनरित्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी सर्व्हिस सुरु असल्याचे अनेक तक्रार रिक्षा संघटनांकडून पुणे आरटीओकडे आली हाेती. त्यानुसार आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांनी याबाबतचा तपास करण्यासाठी अनंत भाेसले यांना सांगितले. त्यानुसार सदर खाजगी दुचाकी वाहनांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करणाऱ्या रॅपीडाे कंपनीस संबंधित सेवा बंद करण्यास सांगण्यात आले हाेते. याबाबत तीन नाेटिस ही बजाविण्यात आले हाेत्या.

कंपनीने अ‍ॅप व वेबसाईटवरुन प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सक्षम प्राधिकरणाकडून परवानगी घेणे अनिवार्य हाेते परंतु ती त्यांनी घेतली नाही. राज्यात बाईक टॅक्सी याेजना सुरु हाेईपर्यंत सेवा पुरवली जाणार नाही असे कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले हाेते. महाराष्ट्रात आतापर्यंत आरटीओने बाईक टॅक्सी या संवर्गात आजपर्यंत काेणताही पराना, लायसन्स जारी केलेले नाही. संबंधित कंपनीने अशाप्रकारे बाईक टॅक्सी सेवेला परवानगी मिळावी म्हणून आरटीओकडे ईमेलवर अर्ज केला हाेता. परंतु ताे फेटाळून आलेला हाेता.

मात्र, सदर घटनेनंतरही कंपनीने अ‍ॅप बेस बाईक टॅक्सी वाहतूुक सुरु ठेवत स्वत:चा आर्थिक फायदा मिळवत असल्याचे निर्देशनास आले आहे. दुचाकी वाहनातून प्रवासी वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची परवानगी घेणे व केंद्र माेटार वाहन समुच्चक मार्गदर्शक तत्वे 2020 चे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र, त्याची पूर्तता न करता कंपनीने व्यवसाय सुरु केला. संबंधित कंपनी विराेधात फेब्रुवारी 2021 पासून पुणे शहरात विविध वाहतुकदार संघटनेकडून आंदाेलने सुरु आहे. सदर कंपनीच्या बेकायदेशीर वाहतुकीच्या व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ही निर्माण झाला.त्यामुळे आरटीओकडून जानेवारी 2021 पासून आतापर्यंत 609 वाहनांवर माेटार वाहन कायदा 1988 अंर्तगत कारवाई करण्यात आलेली आहे. याबाबत पुढील तपास बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर करत आहे.

बातम्या आणखी आहेत...