आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. आता दगडूशेठ गणपती मंदिरामध्येही पाणी शिरुन मंदिरात तलावाचे स्वरुप आले आहे. मंदिराबाहेरही नदीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसत आहे. या पावसाठी भीषणता दाखवणारा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
राज्यभरात परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात शिरलं पाणी, पाहा थरारक VIDEO#punerains #WeatherUpdate #PuneRain pic.twitter.com/5wCoPnWSQM
— renuka dhaybar (@renu96dhaybar) October 15, 2020
दरम्यान शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. पावसाचे हे रौद्ररुप दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये शिरलेले पाणी दिसते आहे. यासोबतच मंदिराबाहेरची मोठ्या प्रमाणात पाऊ वाहत आहे. दरम्यान आजही हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.