आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन:मुंबईत आम्हाला मनसेची गरज नाही

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत भाजप, आरपीआय व शिंदे गटाचे मिळून १५० हून अधिक नगरसेवक निवडून येऊ शकतात. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गरज नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे स्पष्ट केले.

लोणावळ्यात आरपीआय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषद घेत आठवले यांनी बैठकीतील ठरावांसह विविध विषयांवर मतप्रदर्शन केले. मुंबईत आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे. मुंबई महानगरपालिकेत या खेपेला भाजप, आरपीआय व शिंदे गट सत्ता स्थापन करणार यात शंका नाही. मुंबई मनपातील शिवसेनेची सत्ता हिसकावून घेण्याचा आमचा प्रयत्न असून उपमहापौर आरपीआयला मिळावे, असा ठराव आज राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला आहे.

‘भाजप-आरपीआयची आघाडी, मनसेने करू नये बिघाडी’ भाजप, आरपीआय, शिंदे गटात मनसेची एंट्री होणार का? यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, ‘भाजप व आरपीआयची आहे आघाडी, मनसेने यामध्ये करू नये बिघाडी.’ आम्हाला मनसेची गरज नाही. भाजपनेदेखील मनसेसोबत युती करू नये ही आमची भूमिका आहे. आठवले म्हणाले, मनसेच्या मराठीच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असला तरी उत्तर भारतीय व अन्य भाषिक नागरिकांबाबत असलेल्या भूमिकेला आमचा विरोध आहे.

बातम्या आणखी आहेत...