आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक जाणीव प्रगल्भ ठेवा:समाजातील अभागींची जाण ठेवली पाहिजे, खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी मत केले व्यक्त

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संवेदना व सामाजिक जाणीव याशिवाय समाजिक कार्य शक्य नाही. मानव्य संस्थेच्या मार्फत विजया लवाटे यांनी उभे केलेले कार्य संवेदना व सामाजिक जाणीव प्रगल्भ असल्याने उभे राहिले. त्याखऱ्या अर्थाने माऊली होत्या,त्यांच्याप्रमाणे प्रत्येकानेच सामाजातील अभागींची जाण ठेवली पाहिजे असे मत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शनिवारी व्यक्त केले.

‘मानव्य’ संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर होते .यावेळी मंचावर मानव्यचे अध्यक्ष शिरीष लवाटे ,विश्वस्त उज्वला लवाटे, विश्वस्त समीर ढवळे व विश्वस्त विनया देसाई उपस्थित होते.

डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले की ,मानव्य संस्थेतील एच आय व्ही संसर्गित मुले मुली ही अनाथ नसून खरेतर स्वनाथ आहेत .संस्थेतील मुला मुलींचा आत्मविश्र्वास व प्रगती बघून सर्वजणच त्यांना स्वनाथच मानतील .संवेदना व सामाजिकता यातुन निर्माण होणारे कार्य पुढे संस्थात्मक रूपात आकारात येते तेव्हा समर्पण निस्वार्थी भावना बांधिलकी ही मूल्ये गरजेची असतात त्याच बरोबर अधुनिक काळातील गतिमानता ,गुणवत्ता, सादरीकरण या गोष्टी समोर उभ्या ठाकतात या दोन्हींचा मिलाप करून विजया लवाटे यांनी मोठे कार्य निर्माण केले.

याप्रसंगी पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी सर्प दंश या संदर्भातील आपले विविध अनुभव कथन केले. कोकणात सर्प व मण्यार यांपासून विषबाधा झालेल्यांवर मी केलेल्या संशोधनामुळे चांगले उपचार झाले असे सांगुन ते म्हणाले की , ईकाँनाँमिक कर्नसि पेक्षा बा्ैद्धिक करन्सी जास्त महत्वाची आहे.

प्रारंभी ‘मानव्य’च्या एच.आय.व्ही. संसर्गित मुला-मुलींनी प्रार्थना म्हणून नृत्यमय स्वागत केले. यानंतर ‘मानव्य’च्या २५ वर्षांचा वाटचाली वरील डॉक्युमेंटरी दाखवली गेली. यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.ते म्हणाले की,एच आय व्ही संसर्गित मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.समाज जेवढा संवेदनशील बनेल तेवढे सामाजिक प्रश्र्न सुटण्यास मदत होईल.असे सांगून मानव्य संस्थेच्या २५ वर्षाच्या वाटचालीचा त्यांनी आढावा घेतला.या कार्यक्रमात ‘मानव्यच्या पाऊलखुणा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...