आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे उद्घाटन:'सण-उत्सव साजरा करताना मोकळिकीचा समतोल सांभाळावा- ' उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे कोणीही मुक्तपणे व्यक्तीगत आणि सामूहिक जीवन जगू शकले नाही. त्यामुळे यावर्षी सर्व सार्वजनिक महोत्सवांना थोडी मोकळीक देण्यात आली आहे. परंतु, सणवार साजरे करण्यासाठी दिलेल्या मोकळीकीचा समतोल ढळतो आहे की काय असे वाटते आहे. नागरिकांनी दिलेल्या मोकळीकीचा असमतोल होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे'' असे मत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी येथे व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आम्ही कोथरूडकर आयोजित आणि संवाद पुणे निर्मित कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे उद्घाटन आज राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध गायक पं. आनंद भाटे, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, अ‌ॅड. मंदार जोशी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, भारतीय जनता पक्षाचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, मंजुश्री खर्डेकर, संदिप खर्डेकर, कांचन कुंबरे, शिवराम मेंगडे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले, तर अ‌ॅड. मंदार जोशी यांनी आभार मानले. कोथरूडकर मंडळींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. दोन दिवस सलग हा महोत्सव यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये रंगणार असून मुलाखत, मैफल, नाट्यप्रयोग, मुक्त संवाद असे कलाविष्कार रंगणार आहेत. रसिकांसाठी हे सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले आहेत.

प्रारंभी शिल्पा दातार आणि सहकाऱ्यांनी गणेश वंदना सादर केली. तर श्रृंगाली परांजपे आणि सहकाऱ्यांनी जयोस्तुते हे गीत सादर केले. तसेच चित्रपट अभिनेत्री डॉ. तेजा देवकर आणि वैशाली जाधव यांची कथ्थक आणि लावणीची जुगलबंदी रसिकांची दाद घेऊन गेली. यानंतर नाट्यरंग या कार्यक्रमात पं. आनंद भाटे यांचे नाट्यसंगीत आणि अभंग ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...