आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:उद्धव ठाकरे काय बोलतात ते पाहून आम्ही बोलू : भाजप

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १४ मे रोजी मुंबईत हुंकार सभा घेणार आहेत. त्यात ते काय भूमिका मांडतात हे पाहून आम्ही १५ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आमचे मत मांडू. मात्र, शिवसेना सध्या सत्तेत असल्याचे विसरून ते त्यांच्या मूळ भूमिकेत आले आहेत. याची दखल जनताच घेईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साेमवारी पत्रकारांशी बाेलताना सांगितले.

पाटील म्हणाले, नवनीत राणा यांना मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचायची होती, त्या वेळी त्यांना शिवसेनेने सांगायला पाहिजे होते. परंतु सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यावर राणा यांच्या घराबाहेर निदर्शने करण्याची काय गरज होती? ते हनुमान चालिसा म्हणणार होते, रावण चालिसा नाही, असा टाेला त्यांनी लगावला. राणा यांचा लीलावती रुग्णालयातील एमआरआय सुरू असतानाचा फाेटाे व्हायरल झाला यावर सेनेने आक्षेप घेतला. लीलावती रुग्णालय खासगी असून त्या ठिकाणी काय करायचे हे रुग्णालय प्रशासन ठरवेल. परंतु शिवसेना परिपक्व पक्ष असूनही त्यांना त्याचा विसर पडला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण द्यावे, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...