आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदारीचा उपाय:पश्चिम बंगालमधील आंदोलनामुळे पुण्याहून राज्यात जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्या रद्द, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालमध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनामुळे पुण्याहून पश्चिम बंगालला जाणाऱ्या दोन रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने याबाबत माहिती दिली.

सध्या पश्चिम बंगालमध्ये आदिवासी कुर्मी समुदायाला अनुसूचित जातीचा (एसटी) दर्जा मिळावा यासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. हावडा मार्गावरील दोन रेल्वे स्थानकावर हे आंदोलन सुरू असून आंदोलकांनी या ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन केले आहे. यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.

आज, उद्या सुटणाऱ्या रेल्वे रद्द

पुण्यात पश्चिम बंगालहून अनेक नागरिक विविध रोजगारासाठी मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे पुण्यातून पश्चिम बंगालला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील जास्त आहे. प्रामुख्याने आझाद हिंद एक्सरपेसने हे प्रवासी हावडा येथे जात असतात. ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून रोज सुटते. मात्र, या आंदोलनामुळे आज आणि उद्या सुटणाऱ्या गाड्या खबरदारीचा उपाय म्हणून रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती पुणे रेल्वेचे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे.

'या' दोन गाड्या रद्द

पुण्याहून शुक्रवारी हावडा येथे जाणारी १२१२९ पुणे - हावड़ा आजाद हिंद एक्सप्रेस तसेच शनिवारी ८ एप्रिलला हावडा येथे जाणारी १२२२१ पुणे- हावड़ा दुरंतो एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनने दिली आहे.

रेल्वे वाहतूक विस्कळीत

बुधवारी राज्यातील तीन आदिवासी बहुल जिल्हे असलेले पश्चिम मेदिनीपुर, बांकुड़ा व पुरुलिया येथील रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या होत्या. तसेच खड़गपुर मंडळातील खड़गपुर -टाटा आणि आद्रा मंडळातील आद्रा- चांडिल सेक्शनवर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले पुण्याहून शुक्रवारी हावडा येथे जाणारी १२१२९ पुणे - हावड़ा आजाद हिंद एक्सप्रेस तसेच ८ एप्रिलला हावडा येथे जाणारी १२२२१ पुणे- हावड़ा दुरंतो एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.