आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:ज्यांना गाव सोडावं लागतं त्यांच्यावर काय बोलणार? शरद पवारांनी साधला चंद्रकांत पाटलांवर निशाणा

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विधानामुळे सर्वसामान्यांच्या मनात मात्र चिंता निर्माण होणार

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत, मात्र सरकारमधील प्रमुख पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार गप्प बसून आहेत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांना उद्देशून मारला होता. त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला. ‘ज्यांना आपलं स्वतःचं गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावं लागतं, अशा लोकांविषयी मी बोलायचं का...’ अशा शब्दांत पवार यांनी खोचक टिप्पणी केली. दरम्यान, यावर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पवारांना प्रत्त्युतर दिले. आमचे राज्यस्तरीय नेते कुठूनही उभे राहिले तरी ते निवडून येतात, हेच यातून दिसून येते, असे ते म्हणाले.

गोगोईंचे विधान धक्कादायक

निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे विधान धक्कादायक आहे. न्यायव्यवस्था सर्वोच्च मानली असताना असे विधान म्हणजे सत्यकथन तर नाही ना, याचा विचार करायला हवा. त्यांच्या विधानामुळे सर्वसामान्यांच्या मनात मात्र चिंता निर्माण होणार, असे पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...